Kho Kho World Cup : उपांत्यपूर्व फेरीत भारतीय पुरुषांची लढत श्रीलंकेशी, तर महिलांची बांगलादेशशी

Kho Kho World Cup : खो खो विश्वचषकात आता बाद फेरीचा धडाका सुरू झाला आहे

46
Kho Kho World Cup : उपांत्यपूर्व फेरीत भारतीय पुरुषांची लढत श्रीलंकेशी, तर महिलांची बांगलादेशशी
Kho Kho World Cup : उपांत्यपूर्व फेरीत भारतीय पुरुषांची लढत श्रीलंकेशी, तर महिलांची बांगलादेशशी
  • ऋजुता लुकतुके

इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या खो-खो विश्वचषक २०२५ मध्ये भारताच्या पुरुष संघाने सुध्दा महिलांपाठोपाठ दणदणीत विजय साजरा केला. या सामन्यात भारताने भूतानवर ७१-३४ (मध्यंतर ३२-१८)असा ३७ गुणांनी धमाकेदार विजयाची नोंद केली व उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे. सुयश गरगटेला या सामन्यात सामन्याचा मानकरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.   सामन्याच्या पहिल्या टर्नमध्ये भारतीय संघाने आक्रमक सुरुवात करत ३२ गुणांची आघाडी घेतली. भारतीय खेळाडूंनी दाखवलेल्या “स्काय डायव्हिंग”कौशल्याने संपूर्ण प्रेक्षकांची मने जिंकली. चपळाई आणि संघटन कौशल्याचा उत्तम नमुना पाहायला मिळाला. (Kho Kho World Cup)

दुसऱ्या डावात भारताने आपले अफलातून संरक्षण कौशल्य दाखवत भूतानच्या आक्रमणाला दाद दिली नाही. भूतानने वेगवान खेळ करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय संघाच्या रणनीतीमुळे त्यांना फक्त १८ गुण मिळवता आले. तिसऱ्या टर्नमध्ये भारताने आक्रमणात पुन्हा जोरदार प्रदर्शन केले. निखिलने अप्रतिम “स्काय डायव्हिंग” कौशल्य दाखवून संघासाठी ३६ गुण मिळवले. भारतीय संघाने उत्कृष्ट समन्वय साधत २८ गुणांची लयलूट केली. (Kho Kho World Cup)

(हेही वाचा- Central Railway : प्रवाशांनो लक्ष द्या ! मध्य रेल्वेवर १७ आणि १९ जानेवारीला पॉवर ब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक …)

अंतिम टर्नमध्ये भूतानला त्यांच्या वेळेच्या निम्म्या कालावधीत फक्त ९ गुण मिळवता आले. भारतीय बचावाने त्यांना पुन्हा संधी दिली नाही, आणि सामना ३७ गुणांच्या फरकाने जिंकत भारताने विजयश्री खेचून आणली. (Kho Kho World Cup)

दुसरीकडे, भारतीय महिला संघांने शतकी गुणांच्या हॅट्रिकसह अ गटात अव्वल स्थान मिळवताना प्रत्येक सामन्यात गुणांची लयलूट केली. आजच्या मलेशिया विरुध्द झालेल्या सामन्यात भारताच्या संघाने पहिल्या डावात ६ तर दुसऱ्या डावात ४ ड्रीम रन मिळवत संघाला संरक्षणात सुध्दा मजबूत स्थिती मिळवून दिली. बचावपटू भिलार देवजीभाई आणि मोनिकाने त्यांच्या अप्रतिम ड्रीम रनने सामन्याची सुरुवात केली. मध्यंतराला भारताने ४४-०६ अशी ३८ गुणांची आघाडी घेत आपण पुन्हा एकदा गुणांची लयलूट करू असा जणू इशाराच दिला. गेल्या दोन सामन्यात भारताने १७५ व १०० गुण मिळवत एक आगळा वेगळा विश्वविक्रम केला होता. आज सुध्दा भारताने गुणांची शंभरी गाठत विजयासह शतकी गुणांची हॅट्रिक केली. भारताने हा सामना १००-२० असा ८० गुणांनी जिंकला. (Kho Kho World Cup)

(हेही वाचा- आता सरकारी कार्यालयात खेटे मारणे होणार बंद; Government Services मिळणार मोबाईलवर)

 या सामन्यात भारतीय संघाने सामन्याची सुरुवात बचावातील मजबूत कामगिरीसह केली. बचावपटू भिलार देवजीभाई (१.१५ मि. संरक्षण व ६ गुण), आणि मोनिकाच्या (३.२० मि. संरक्षण व ४ गुण),  ड्रीम रनने सामन्याचा स्वरूप पालटवले. पहिल्या टर्नमध्ये ५ मिनिटे ५० सेकंद बचाव केल्यानंतर सामन्याचा पहिला डाव ६-६ अशा बरोबरीत संपला. त्यानंतर प्रियांका, नीतू आणि मीनू यांनी पहिल्या डावाच्या शेवटी शानदार कामगिरी करत संघाचा आत्मविश्वास वाढवला.  (Kho Kho World Cup)

दुसऱ्या टर्नमध्ये खेळाच्या फक्त २७ व्या सेकंदाला मलेशियाच्या पहिल्या गटातील सर्व खेळाडूंना बाद करण्यात आले. यामुळे भारतीय संघाला मोठा आघाडी घेण्यासाठी संधी मिळाली. मोनिका आणि वझीर निर्मला भाटी (२.१६ मि. संरक्षण व २ गुण) यांनी आक्रमणात संघाला प्रचंड बळ दिले. मलेशियाच्या संघासाठी एंग झी यी आणि लक्षिता विजय यांनी संघाला प्रतिकाराची संधी मिळवून दिली. मलेशियाला ड्रीम रन साध्य करण्याची संधी मिळाली होती, पण 1 मिनिट 4 सेकंदांनी ते कमी पडले. (Kho Kho World Cup)

(हेही वाचा- Delhi Elections राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ उमेदवार; स्टार प्रचारक फक्त २०!)

तिसऱ्या टर्नमध्ये सुभाष्री सिंगने भारतासाठी आणखी एक ड्रीम रन मिळवला. या डावात भारतीय संघाने ४ मिनिटे ४२ सेकंद शानदार संरक्षण केले व रेश्मा राठोड (१.१५ मि. संरक्षण व ६ गुण) यांनी दिलेल्या लढतीमुळे संघाने मोठी आघाडी घेतली. तिसऱ्या टर्ननंतर स्कोअर ४८-२० असा होता. (Kho Kho World Cup)

चौथा डावही भारतीय संघासाठी आक्रमण करताना तितकाच प्रभावी ठरला. सामन्यात पूर्ण वर्चस्व गाजवत भारतीय संघाने ८० गुणांच्या फरकाने मलेशियाला पराभूत केले.  (Kho Kho World Cup)

(हेही वाचा- Mahakumbh 2025 : महाकुंभवर PHD साठी देशभरातून आले अधिकारी; ‘या’ विषयांचा अभ्यास करणार)

सामन्याचे पुरस्कार:

सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू: एंग झी यी

सर्वोत्कृष्ट बचावपटू: मोनिका

सामन्याची उत्कृष्ट खेळाडू: रेश्मा राठोड 

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.