MLA Sangram Jagtap यांनी हटवले सिद्धटेक येथील सिद्धिविनायक मंदिरासमोरील अतिक्रमण

89
MLA Sangram Jagtap यांनी हटवले सिद्धटेक येथील सिद्धिविनायक मंदिरासमोरील अतिक्रमण
MLA Sangram Jagtap यांनी हटवले सिद्धटेक येथील सिद्धिविनायक मंदिरासमोरील अतिक्रमण

हिंदू धार्मिकतेच्या विरोधात उभारलेले अतिक्रमण सहन करणार नाही, असे प्रतिपादन अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगतापयांनी केले. कर्जत तालुक्यातील सिध्दटेक येथील सिद्धिविनायक मंदिरास मोरील अतिक्रमण (Encroachment) आमदार आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी जय श्रीरामाचा नारा व गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोष करत हटविले. या प्रसंगी ते बोलत होते.

सिद्धटेक येथील सिद्धिविनायक मंदिरासमोर अनधिकृतपणे अतिक्रमण उभारण्यात आले असून वक्फ बोर्डाने देखील दावा केल्याचे नागरिक सांगत आहे. सिद्धिविनायक मंदिर हे अष्टविनायकापैकी एक गणपती मंदिर असून हिंदू बांधवांचे श्रद्धास्थान असून हिंदू धार्मिकतेच्या विरोधात उभारलेले अतिक्रमण सहन करणार नाही; म्हणून सिद्धटेक येथील सिद्धिविनायक मंदिरासमोरील थडग्याचे अतिक्रमण शेकडो हिंदू बांधवांच्या साक्षीने काढण्यात आले.

(हेही वाचा – Delhi Elections राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ उमेदवार; स्टार प्रचारक फक्त २०!)

या वेळी ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदू धार्मिक स्थळाजवळ अशा प्रकारचे अनाधिकृत कृत्य करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या जात असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर (Sri Siddhivinayak Temple), सिद्धटेक येथे अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या थडग्यांविरोधात नगर जिल्ह्यातील सकल हिंदू समाज आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर आ. संग्राम जगताप व सागर बेग यांच्या नेतृत्वाखाली शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्ते कर्जतमध्ये दाखल झाले. सदर प्रकरणात मंदिराच्या समोरील काही भागात अनधिकृतपणे थडगे उभारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हा भाग वक्क्फ बोर्डाचा असल्या चा दावा काही गटां कडून केला जातो; मात्र हिंदू समाजाने या प्रकाराला तीव्र विरोध दर्शवत, अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी मोहीम राबवि ण्याचा निर्धार केला. सकाळपासून आ. संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) व सागर बेग आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा ताफा सिद्धटेकमध्ये दाखल होत जय श्रीरामच्या व गणपती बप्पा मोरयाच्या घोषणा देत अनधिकृत अतिक्रमण काढण्यात आले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.