Indian Cricket Team : भारतीय संघाला अखेर मिळाले फलंदाजीचे प्रशिक्षक, सितांशू कोटक यांची वर्णी

Indian Cricket Team : कोटक सध्या भारतीय ए संघाचे प्रशिक्षक आहेत 

42
Indian Cricket Team : भारतीय संघाला अखेर मिळाले फलंदाजीचे प्रशिक्षक, सितांशू कोटक यांची वर्णी
Indian Cricket Team : भारतीय संघाला अखेर मिळाले फलंदाजीचे प्रशिक्षक, सितांशू कोटक यांची वर्णी
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाच्या प्रशिक्षकांच्या ताफ्यात अपेक्षेप्रमाणे वाढ झाली आहे. मुख्य प्रशिक्षक गंभीरची प्रशिक्षकाची मागणी तर बीसीसीआयने पूर्ण केली. पण, निवड स्वत: केली आहे. अगदी इंग्लंड विरुद्धच्या मालिकेपासूनच कोटक भारतीय संघाबरोबर असतील. रविवारी आढावा बैठक झाली तेव्हा गंभीरनेच फलंदाजीच्या प्रशिक्षकाची मागणी केली होती. सध्या भारतीय संघाबरोबर मॉर्नी मॉर्केल हे गोलंदाजीचे प्रशिक्षक आहेत. तर अभिषेक नायर आणि रायन टेन डयुसकाटे हे दोन सहाय्यक प्रशिक्षक आहेत. या ताफ्यात आता कोटक यांची भर पडणार आहे. (Indian Cricket Team)

सितांशू कोटक भारताकडून राष्ट्रीय संघात खेळलेले नाहीत. पण, भारतीय ए संघाबरोबर ते सध्या काही वर्षं आहेत. आणि बीसीसीआयच्या क्रिकेट अकादमीतही कार्यरत आहेत. ‘ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर गंभीरने फलंदाजांचं अपयश पाहता, प्रशिक्षकाची गरज व्यक्त केली होती. ती मागणी बीसीसीआयने उचलून धरली आहे. त्यानंतर काही जणांशी चर्चा करून कोटक यांचं नाव पक्कं करण्यात आलं,’ असं बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितलं आहे.  (Indian Cricket Team)

(हेही वाचा- Kho Kho World Cup : उपांत्यपूर्व फेरीत भारतीय पुरुषांची लढत श्रीलंकेशी, तर महिलांची बांगलादेशशी)

भारतीय संघ ऑस्ट्रेलियात असताना ए संघही सुरुवातीला तिथे होता. आणि सितांशू कोटक या संघाबरोबर ऑस्ट्रेलियात होते. तर द्रविड यांचा कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीर सूत्र हाती घेईपर्यंत कोटकच भारतीय संघाबरोबर होते. ऑगस्ट २०२३ च्या आयर्लंड दौऱ्यातही ते भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. या दौऱ्यात जसप्रीत बुमरा संघाचा कर्णधार होता. (Indian Cricket Team)

५२ वर्षीय सितांशू कोटक डावखुरे फलंदाज आहेत. आणि १९९३ ते २०१३ या कालावधीत त्यांनी सौराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आहे. १३० प्रथमश्रेणी सामन्यांत त्यांनी ४१ च्या सरासरीने ८,०६१ धावा केल्या आहेत. यात १५ शतकं आणि ५५ अर्धशतकांचा समावेश आहे. निवृत्तीनंतर कोटक यांनी पूर्णवेळ प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं आहे. आधी ते सौराष्ट्र रणजी संघाचे प्रशिक्षक होते. आणि त्यानंतर गेली काही वर्षं ते बीसीसीआयच्या क्रिकेट अकादमीत कार्यरत आहेत. मागील ४ वर्षं नियमितपणे ते भारतीय ए संघाबरोबर आहेत.  (Indian Cricket Team)

(हेही वाचा- MLA Sangram Jagtap यांनी हटवले सिद्धटेक येथील सिद्धिविनायक मंदिरासमोरील अतिक्रमण)

भारतीय संघात आता गौतम गंभीर यांच्याबरोबर अभिषेक नायर, रायन टेन ड्युसकाटे, मॉर्नी मॉर्केल आणि टी दिलीप यांच्याबरोबर सितांशू कोटकही प्रशिक्षक म्हणून असतील. यातील ड्युसकाटे आणि अभिषेक नायर यांच्यावर बीसीसीआयची सध्या वक्रदृष्टी आहे. (Indian Cricket Team)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.