All India Bhajan Conference : मुंबईत १८ व १९ जानेवारीला होणार पहिले अखिल भारतीय भजन संमेलन

186
All India Bhajan Conference : मुंबईत १८ व १९ जानेवारीला होणार पहिले अखिल भारतीय भजन संमेलन
All India Bhajan Conference : मुंबईत १८ व १९ जानेवारीला होणार पहिले अखिल भारतीय भजन संमेलन

अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ (रजि.) महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रथमच देश पातळीवरील अखिल भारतीय भजन संमेलन २०२५ चे आयोजन शनिवार दि. १८ व रविवार दि. १९ जानेवारी २०२५ रोजी दादर माटुंगा कल्चरल सेंटर(DMCC), यशवंत नाट्यगृह शेजारी,माटुंगा (प.), मुंबई येथे करण्यात आले आहे. (All India Bhajan Conference)

हेही वाचा-Accident News : पुणे – नाशिक महामार्गावर भीषण अपघात ; ९ जणांचा मृत्यू

या पहिल्या भजन संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अशिष शेलार (Ashish Shelar) हे करणार असून या भजन संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध भजनकार अणि अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ अध्यक्ष बुवा भगवान लोकरे तर संमेलनाध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे हे आहेत. (All India Bhajan Conference)

शनिवार, दि. १८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ठीक ८.०० वाजता भजन दिंडी शोभायात्रा स्वर्गीय कोकण कला भूषण भजन सम्राट चंद्रकांत कदम बुवा यांच्या निवास स्थानापासून स्वर्गीय भजन रत्न भजनकार विलास पाटील बुवा व स्व. संगीतकार/भजनकार बुवा स्नेहल भाटकर यांचे निवासस्थान आणि संमेलन स्थळापर्यंत सर्वोदय कॉलनी, पोर्तुगीझ चर्च जवळ, दादर (प) येथे निघणार आहे. सकाळी ९.३० वाजता स्वागत / उद्घाटन समारंभ आणि प्रकाशन सोहळा संपन्न होईल. या प्रकाशन सोहळ्यात लोककला अभ्यासक प्राध्यापक वैभव खानोलकर, सिंधुदुर्ग यांचे दशावतार लोककलेचे सर्वांगीण शोध घेणारे संशोधनात्मक पुस्तक एक समृद्ध लोककला दशावतार मुखपृष्ठ प्रकाशन होणार आहे. (All India Bhajan Conference)

हेही वाचा-Mahakumbh 2025 : महाकुंभवर PHD साठी देशभरातून आले अधिकारी; ‘या’ विषयांचा अभ्यास करणार

या सोहळ्यात जेष्ठ मालवणी कवी श्री. दादा मडकईकर हे सुद्धा सहभागी होणार आहेत. तर सकाळी ११.०० वाजता भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी ०२.०० वाजता अखिल भारतीय भजन संस्कृती परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात श्री. वल्लभभाई सावलीया (भजन अभ्यासक कीर्तनकार, गुजरात), श्री. अनंतम लोकनाथ (भजन अभ्यासक कीर्तनकार, तामिळनाडू राज्य), श्री. प्रशांत धोंड (प्राचार्य भजन अभ्यासक कीर्तनकार, महाराष्ट्र), श्री. लोकेश चतुर्वेदी (भजन अभ्यासक, मथुरा उत्तरप्रदेश), सुसंवाद : रिद्धी म्हात्रे (वृत्तनिवेदिका पुढारी न्युज चॅनेल) हे सहभागी होणार आहेत. दुपारी ४.०० वाजता रेल्वे प्रवासी भजनी मंडळातील प्रसिद्ध भजन गायक श्री. अविनाश आंग्रे व भजन गायिका सानिका कणसे यांचे गायन व चर्चा होणार असून याचे निवेदन मनश्री पाठक, पत्रकार झी २४ तास या करणार आहेत. संध्याकाळी ६.०० वाजता परिसंवाद ध्वनी योजना आणि ध्वनी संयोजन याचे आयोजन करण्यात आले असून यात श्री. अनंत बाईत (ज्येष्ठ ध्वनी संजोयक) व श्री. श्रीकृष्ण सावंत (ज्येष्ठ ध्वनिमुद्रक) सहभागी होणार आहेत. याचे निवेदन प्रा. वैभव खानोलकर हे करणार आहेत. संध्याकाळी ६.०० नंतर साईदामोदर भजनी मंडळ, मडगांव (गोवा) श्री. शुभम नाईक आणि यांचा भजन संध्या कार्यक्रम सादर होऊन पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता होईल. (All India Bhajan Conference)

हेही वाचा-NEET-UG 2025 : नीट यूजी परीक्षा यंदा पेन आणि पेपर मोडमध्ये होणार, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

रविवार, दि. १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८.०० वा. पासून भजन स्पर्धा होईल. दुपारी २.०० वाजता भजनाची कार्यशाळा होणार असून यात बुवा श्री. निवृत्ती चौधरी (ज्येष्ठ भजनकार), बुवा श्री. गोपीनाथ बागवे (ज्येष्ठ भजनकार), बुवा श्री. भालचंद्र केळूसकर (सिंधुरत्न भजनकार), बुवा श्री. महादेव शाहबाजकर (ज्येष्ठ भजनकार), बुवा श्री. प्रकाश चिले (गायक / परिक्षक), श्री. ज्ञानेश्वर (माऊली) सावंत (ज्येष्ठ मृदुंगमणी), श्री. बाळू थोरवे (ज्येष्ठ तबला वादक), श्री. प्रताप पाटिल (पखवाज वादक), श्री. संतोष शिर्सेकर (सुप्रसिद्ध भजनकार), श्री. प्रशांत धोंड (भजन समीक्षक / प्राचार्य / कीर्तनकार), श्री. संतोष कासले (आयोजक विजय क्रिडा मंडळ, भांडुप), श्री. संतोष कानडे (मानधन समिती अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा) हे मार्गदर्शन करणार असून लोककला अभ्यासक प्रा. वैभव खानोलकर व लोककला समीक्षक / पत्रकार श्री. राजा सामंत हे निवेदन करणार आहेत. संध्याकाळी ४.०० वाजता भजन स्पर्धा बक्षिस वितरण समारंभ व भजन क्षेत्रात जीवन वाहून घेतलेल्या भजनी बुवा / कलाकार यांना जीवन गौरव पुरस्कार वितरण आमदार रविंद्र चव्हाण साहेब, भाजप, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे. संध्याकाळी ७.०० वाजता सुरमयी भजन संमेलन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात गायक श्री. अजित गोसावी (संगीत अलंकार) आणि सहकारी गायक श्री. महेश कंठे (आवाज महाराष्ट्राचा महाविजेते लोकप्रिय गायक) आणि मंडळी पसायदान कु. भैरवी सुनिल जाधव हे सादरीकरण करणार आहेत. अखिल भारतीय भजन संमेलन सांगता सोहळ्याचे अध्यक्ष आमदार श्री. सुनिल प्रभू हे असणार असून विविध राजकीय पक्षांचे पक्षप्रमुख, नेतेमंडळी, मंत्री महोदय हे देखील प्रमुख उपस्थित राहणार आहेत. (All India Bhajan Conference)

हेही वाचा-Indian Cricket Team : भारतीय संघाला अखेर मिळाले फलंदाजीचे प्रशिक्षक, सितांशू कोटक यांची वर्णी

या संमेलनात उद्योग मंत्री उदय सामंत, मत्स्यव्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे, खासदार संजय पाटील, आमदार ऍड.अनिल परब,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी खासदार,विनायकजी राऊत,आमदार महेश सावंत, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार संजय, आमदार सुनिल राऊत, आमदा अशोक पाटिल, आमदार सुभाष भोईर, मनसे नेते शिरीष सावंत, मनसे प्रवक्ते संदिपजी देशपांडे, मा. उपमहापौर ठाणे रमाकांत मढवी, शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. दत्ता सामंत हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच कमलेश सुतार, (कार्यकारी संपादक झी २४ तास) प्रसाद मच्छिंद्र कांबळी (नाटक निर्माता व अध्यक्ष अखिल भारतीय नाटक परिषद मुंबई) , संगीतकार मिलिंद जोशी, संगीतकार विजय गवंडे, गीतकार मंगेश कांगणे, लेखक संजय सावंत, दशावतार कलावंत प्रकाश लब्दे, अभिनेता दिगंबर नाईक, गीतकार गुरु ठाकूर, अभिनेत्री लतिका सावंत, गझल गायक भीमराव पांचाळे आदी उपस्थित राहणार आहेत. (All India Bhajan Conference)

या भजन संमेलनात सर्व भजन प्रेमी, भजनी कलाकार, नागरिक या मोठ्या संख्येने सहभागी होऊन संमेलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ अध्यक्ष श्री. भगवान लोकरे व सचिव श्री. प्रमोद गणपत हर्याण यांनी केले आहे. (All India Bhajan Conference)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.