Raigad water shortage :हिवाळ्यातही रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा; १००० गाव-वाड्यांमधील जनतेचे हाल

169
रायगड जिल्ह्यात (Raigad District) संभाव्य पाणीटंचाईचा (water shortage) सामना करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून आतापासूनच उपाययोजनांवर भर दिला जात आहे, तसेच नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी यंदा पाच कोटी ६२ लाख ६८ हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून, मंजुरीसाठी वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला आहे. आराखड्यात एक हजार १६ गाव- वाड्यांचा समावेश करण्यात आला असून, टंचाईवर निवारणासाठी उपाययोजनाही प्रस्तावित केल्या आहेत.  (Raigad water shortage)
रायगड जिल्ह्यातील काही गावांना एप्रिल, मेमध्ये दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्याचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात विहिरी खोल करणे, त्यामधील गाळ काढणे, टंचाईग्रस्त गावांना टँकर, बैलगाडीच्या माध्यमातून पाणीपुरवठा करणे, नवीन विहीर खोदणे, विहिरींची दुरुस्ती करणे या उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत.

संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यावर दृष्टिक्षेप

उपाययोजना : गावे : वाड्या अपेक्षित खर्च

विहिरीतील गाळ काढणे, खोली वाढवणे : २४ : ४९: ६० लाख १८ हजार

टँकर, बैलगाडीने पाणीपुरवठा : १८६ : ५४० : ३ कोटी ५३ लाख

नवीन विंधन विहिरी: २७ : ८० : १ कोटी ३ लाख ६८ हजार

विंधन विहिरींची दुरुस्ती : ३९: ७१ : ४५ लाख ९० हजार

जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे, तसेच पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी पाण्याचा वापर जपून करावा, अपव्यय करू नये, पिण्याच्या पाण्याच्या (drinking water) मुख्य स्त्रोतांव्यतिरिक्त परिसरातील इतर उपलब्ध स्त्रोतांमधील पाण्याचा दैनंदिन वापरासाठी वापर करावा, पाणी स्त्रोत दूषित होणार नाहीत याची सर्वांनी काळजी घ्यावी, कुठे जलवाहिनी फुटली असल्यास निदर्शनास आणून द्यावी. – डॉ. भरत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड

(हेही वाचा – Chhattisgarh Naxalites : छत्तीसगडमध्ये नलक्षवाद्यांकडून पुन्हा IED स्फोट, बीएसएफचे 2 जवान जखमी )

पेण-खारेपाटातील १९६ गावांसाठी आराखडा तयार

पेणचा वाशी खारेपाट विभाग अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाणीटंचाईला सामोरे जात आहे. २०२५-२६ या वर्षाकरिता पेण पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील १६० वाड्या आणि ३६ गावांसाठी जवळपास एक कोटी ८९ लाख ५० हजार रुपयांचा पाणीटंचाई आराखडा तयार करून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. जलजीवनच्या (JalJeevan Yojana) योजनांसाठी हजारो कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असता तरी आजतागायत या भागाला पिण्यासाठी सुरळीत पाणीपुरवठा झालेला नाही. आराखड्याला मंजुरी मिळताच टंचाईग्रस्त गावांना त्वरित टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पेण पंचायत समितीकडून (Pen Panchayat Samiti) देण्यात आली आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.