Uttar Pradesh मध्ये धर्मांधांने केली काश्मिरी पंडिताची हत्या

68
Uttar Pradesh मध्ये धर्मांधांने केली काश्मिरी पंडिताची हत्या
Uttar Pradesh मध्ये धर्मांधांने केली काश्मिरी पंडिताची हत्या

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बरेली येथे एका कट्टरपंथीने काश्मिरी पंडिताची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, पीडीत व्यक्ती काश्मिरी पंडित असून, ९०च्या दशकात कट्टरपंथीयांच्या अत्याचारानंतर त्यांनी जम्मू काश्मीरमधून पलायन केलं होतं. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) स्थायिक झाले. मांस शिजवण्याच्या कारणावरून झालेल्या वादात काश्मिरी पीडिताची हत्या कट्टरपंथींनी केली आहे. हत्या करणाऱ्याचे नाव सागिर अहमद (Sagir Ahmed) असून त्याला उत्तर प्रदेश पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

( हेही वाचा : Chhattisgarh Naxalites : छत्तीसगडमध्ये नलक्षवाद्यांकडून पुन्हा IED स्फोट, बीएसएफचे 2 जवान जखमी

हरबन्स लाल (Harbans Lal) यांचे अहमद (Sagir Ahmed) यांच्या कुटुंबियांशी भांडण झाले. अहमद यांचे कुटुंब मासंहार करत असे. त्यामुळे लाल यांना मांसाहाराची दुर्गंधी सहन न झाल्यामुळे त्यांनी भिंतीवर फायबर शीट्स लावायचा निर्णय घेतला. परंतु सागिर अहमद यांनी त्याला विरोध दर्शवला. सागिर अहमद (Sagir Ahmed) यांच्या बायकोने सुद्धा लाल यांच्या कुटूंबियांसोबत भांडण करायला सुरूवात केली. हरबन्स लाल यांचा मुलगा हेमंत लाल याने तक्रारीत सांगितले की, यापूर्वी सुद्धा अहमद यांच्या कुटुंबियांशी हरबन्स यांचे भांडण झाले होते. मात्र दि. १५ जानेवारी रोजी भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी अहमदसोबत झालेल्या भांडणात हरबन्स गंभीर जखमी झाले. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर हरबन्स यांना मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी सागिर आणि त्याच्या बायकोच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Uttar Pradesh)

हेमंत लाल (Hemant Lal) याप्रकरणी म्हणाले की, ९०च्या दशकात काश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचारामुळे, त्यांचे कुटुंबीय उत्तरप्रदेशमध्ये स्थायिक झाले. बरेलीच्या त्या वस्तीत एकूण ३२ हिंदू कुटुंबीय राहत होते. बरेली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले आहेत. तसेच हेमंत लाल यांच्या तक्रारीनुसार तपासणी सुरु आहे. एसपी मानुष पारीक यांनी असेही सांगितले की, हरबन्स लाल यांच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळल्या नसून, शवविच्छेनानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. (Uttar Pradesh)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.