- प्रतिनिधी
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) हाती घेतलेल्या कासारवडवली-गायमुख मेट्रो ४A मार्गिकेच्या खर्चात ६३.६७ कोटी रुपयांची वाढ झाल्याची माहिती उघड झाली आहे. मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेने माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिलेल्या उत्तरात ही माहिती दिली आहे. (Kasarvadavali-Gaimukh Metro Project)
प्रकल्पाचा तपशील :
कासारवडवली-गायमुख मार्गिका मेट्रो ४A प्रकल्पांतर्गत मे. जे. कुमार इंफ्राप्रोजेक्ट्स लिमिटेडला काम देण्यात आले होते. या प्रकल्पासाठी सुरुवातीचा खर्च ४४०.८४ कोटी रुपये ठरवण्यात आला होता. मात्र, वाढीव कामांसाठी हा खर्च ६३.६७ कोटी रुपयांनी वाढून आता ५०४.५१ कोटी रुपये इतका झाला आहे. (Kasarvadavali-Gaimukh Metro Project)
(हेही वाचा – Hindenburg Research Shutdown : हिंडेनबर्ग नेमकी कशामुळे बंद होतेय, ट्रम्प सरकारची भीती की शॉर्ट सेलिंगचे निर्बंध?)
मुदतवाढ आणि दंड :
प्रकल्पाचे काम ३१ मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, प्रकल्पाच्या विलंबामुळे आता या कामाला एप्रिल २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विलंब झाल्यामुळे मे. जे. कुमार इंफ्राप्रोजेक्ट्स लिमिटेडला २२ लाख रुपयांचा नाममात्र दंड आकारण्यात आला आहे, जो त्यांनी भरलेला आहे. (Kasarvadavali-Gaimukh Metro Project)
RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांचे मत :
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी या प्रकल्पाला घोडबंदर मार्गावरील वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण ठरवले आहे. त्यांच्यामते, मेट्रो ४A हा प्रकल्प मेट्रो १० (गायमुख ते शिवाजी चौक) आणि मेट्रो ४ (ठाणे ते वडाळा) या मार्गिकांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर पूर्ण होणे गरजेचे आहे. (Kasarvadavali-Gaimukh Metro Project)
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर घोडबंदर मार्गावर मेट्रोचा पर्याय निर्माण होईल. यामुळे प्रवाशांना सुलभ वाहतूक उपलब्ध होईल तसेच ठाणे, वडाळा आणि शिवाजी चौक या भागांतील कनेक्टिव्हिटी सुधारेल. खर्चवाढ आणि मुदतवाढ असूनही, हा प्रकल्प पूर्ण झाल्यास शहराच्या वाहतुकीच्या समस्या कमी होऊन प्रगत सुविधांचा लाभ नागरिकांना मिळेल. (Kasarvadavali-Gaimukh Metro Project)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community