- प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) चे 12 आणि गोव्यातील 02 असे एकूण 14 स्वयंसेवक कर्तव्यपथावर तसेच जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये भर थंडीत कसून सराव करीत आहेत. राजधानी दिल्ली येथे 76 व्या प्रजासत्ताक मुख्य कार्यक्रमासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने एनएसएसच्या सराव शिबिराला जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे सुरुवात झालेली आहे. या सराव शिबिरात देशभरातून राष्ट्रीय सेवा योजनेचे एकूण 200 स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. हे शिबिरार्थीं योग, कवायत, परेड संचलन सराव, बौद्धिक सत्र, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी आहेत. (Republic Day Parade 2025)
महाराष्ट्रातील स्वयंसेवकांनी सांस्कृतिक कार्यक्रमात राज्यात साजरे होणारे विविध सणांचे सादरीकरण केले. या अंतर्गत ‘मकरसंक्रातीचे महाराष्ट्रातील महत्त्व’ या सादरीकरणाला उपस्थितांनी दाद दिली. या बरोबर 10 ते 12 जानेवारी रोजी सर्व शिबिरार्थी राष्ट्रीय युवक महोत्सवानिमित्त भारत मंडपम प्रगती मैदान येथे सहभागी झाले होते. हे शिबिर 31 जानेवारी 2025 पर्यंत चालणार असून दररोज सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे सराव करीत असतात, अशी माहिती महाराष्ट्रातून एनएसएसच्या स्वयंसेवकांना घेऊन येणारे डॉ. बी. एन. पुरंदरे कला, एस. जी. गुप्ता वाणिज्य व एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालय, लोनावाळा कॉलेजचे प्राध्यापक डॉ. पवन शिनगारे कार्यक्रम अधिकारी म्हणून आलेले आहेत त्यांनी दिली. (Republic Day Parade 2025)
(हेही वाचा – Hindenburg Research Shutdown : हिंडेनबर्ग नेमकी कशामुळे बंद होतेय, ट्रम्प सरकारची भीती की शॉर्ट सेलिंगचे निर्बंध?)
महाराष्ट्रातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा असणार समावेश
महाराष्ट्रातून एकूण बारा एनएसएसचे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. यातील 11 विद्यार्थी विद्यार्थिनी हे मुख्य पथसंचलनात असणार आहेत. एकूण सहभागी झालेले स्वयंसेवक हे राज्यातील विविध कॉलेजमधून आहेत. सिटी प्रीमियर कॉलेजचा तेजस सोनसरे, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील जी. जी. खडसे कॉलेजचा हरीओम इंगळे, नाशिक जिल्ह्यातील (निफाड, लासलगाव) एन. व्ही. पी. मंडल्स आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेजचा स्वरूप ठाकरे, वर्धा जिल्ह्यातील बजाज कॉलेज ऑफ सायन्सचा गुरु प्रसाद सतोने, मुंबई येथील के. सी. कॉलेजचा, आदित्य चंदोला, विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधला राहुल धर्मराज, केटीएचएम कॉलेज नाशिक येथील कविता शेवरे, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग फॉर वूमन पुणे येथील वेदिका राजेमाने, हुजूरपागा दुर्गाबाई मुकुंदास महिला विज्ञान महाविद्यालय पुणे येथील पूजा बोंडगे, महात्मा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क तलोडा येथील सुनिता उंद्या, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद येथील अभिज्ञा मानुरकर, आर. एल. टी. कॉलेज ऑफ सायन्स, अकोला येथील लीना आठवले असे एकूण बारा विद्यार्थी एनएसएसच्या शिबिरात सराव करीत आहेत. (Republic Day Parade 2025)
गोवा राज्यातून दोन स्वयंसेवकांचा समावेश असून विद्या प्रबोधिनी कॉलेज ऑफ कॉमर्स एज्युकेशन कम्प्युटर अँड मॅनेजमेंट, प्रवरी येथील फाल्गुन प्रीओलकर आणि गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स खंडोला येथील अक्षता कलासगौदर चा समावेश आहे. या शिबिरासाठी भारतातून 200 स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. यामधून 148 स्वयंसेवक कर्तव्यपथ येथे प्रजासत्ताक दिनी पथसंचलन करतील. हा एकूण चमु प्रधानमंत्री यांना आणि राष्ट्रपती यांनाही भेटणार आहेत आहेत. (Republic Day Parade 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community