दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Legislative Assembly) पार्श्वभूमीवर भाजपाने (BJP) निवडणुकीचा जाहीरनामा (संकल्प पत्र) जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे भाजपाने दि. १७ जानेवारी रोजी संकल्प पत्र जाहीर करत दिल्लीकरांना विकासाची गॅरंटी दिली आहे. या जाहीरनाम्यातील विविध आश्वासनांद्वारे भाजपाने सायलेंट वोटर मानल्या जाणाऱ्या महिलांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाने महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली आहे. (Delhi Legislative Assembly)
( हेही वाचा : Mahakumbh मध्ये आतापर्यंत 7 कोटींहून अधिक भाविकांचे स्नान)
भाजपाचे (BJP) अध्यक्ष जे.पी.नड्डा (J. P. Nadda) यांनी दि. १७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहिरनाम्याद्वारे भाजपाने जनतेसाठी सरकारची तिजोरी उघडण्याचं आश्वासन दिलं आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर भाजपाने महिला समृद्धी योजनेची घोषणा केली आहे. या योजनेद्वारे महिलांना दरमहा २५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच आम्ही सत्तेत आलो तर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत ही योजना जाहीर करू, असेही नड्डा म्हणाले. तसेच एलपीजी सिलेंडरवर गरीब महिलांना ५०० रुपयांचं अनुदान देणार असल्याचं आश्वासनही भाजपाने (BJP) दिलं आहे. यासह होळी व दिवाळीला एकेक सिलिंडर मोफ्त देण्याचं आश्वासन दिलं आहे. (Delhi Legislative Assembly)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community