Yamaha कडून ऐतिहासिक भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये प्रदर्शन

41
Yamaha कडून ऐतिहासिक भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये प्रदर्शन

इंडिया यामाहा मोटर (आयवायएम) ला १७ ते २२ जानेवारीदरम्यान आयोजित केलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये सहभागी होताना खूप अभिमान वाटतो आहे. चार दशकांच्या इतिहासाचा वारसा आणि भविष्यासाठी नावीन्यपूर्ण दूरदर्शिता यांचे प्रदर्शन येथे घडवण्यात आले. या ब्रँडच्या पॅव्हिलियनमध्ये यामाहाचे भारताच्या प्रीमियम दुचाकी क्षेत्रातील महत्त्वाचे योगदान तसेच मोबिलिटी लँडस्केपला आकार देण्याप्रति वचनबद्धता अधोरेखित झाली आहे. पॅव्हिलियनची संकल्पना “अस्‍पायरेशन्‍स अनव्‍हील्‍ड” ही असून त्यातून यामाहाची प्रचंड मेहनत आणि तरूण भारतीय रायडिंगना प्रेरणा देण्याबाबत कटिबद्धता दिसते. आपला समृद्ध वारसा आणि भविष्यातील महत्त्वाकांक्षा एकत्र आणून यामाहा डायनॅमिक उत्पादने आणि अद्वितीय अनुभवांद्वारे ग्राहकांना लाइफस्टाइल, परफॉर्मन्स आणि नावीन्यपूर्णता देण्यासाठी प्रयत्नशील आहे. (Yamaha)

४० वर्षांचा वारसा : यामाहाचा अद्वितीय इतिहास

यामाहाच्या पॅव्हिलियनमध्ये त्यांचा ऐतिहासिक वारसा प्रदर्शित केला गेला आहे. ख्यातनाम ऐतिहासिक मोटरसायकल्स जसे आरएक्स-१०० आणि आरडी-३५० ज्यांनी भारताला परफॉर्मन्स मोटरसायकलिंगसाठी प्रेरित केली त्या इथे दिसतील. या पॅव्हिलियनमधून यामाहाच्या प्रीमियम रेंजमधील पहिल्या पिढीच्या मॉडेल्सही आहेत. त्यात लोकप्रिय वायझेडएफ-आर१५ आणि मस्क्युलर एफझेड सिरीज समाविष्ट आहे. त्यांनी भारतीय बाजारपेठेत नवीन मानके स्थापित केली. येथील ‘हिस्ट्री अरेना’मध्ये यामाहाचा आतापर्यंतचा प्रवास आपल्याला पाहायला मिळेल. त्यात अविस्मरणीय आठवणी आणि जागतिक व भारतीय इतिहासातील महत्त्वाचे टप्पे समाविष्ट आहेत. भेट देणाऱ्यांना यामाहाच्या जागतिक इतिहासाचा अभ्यास करता येईल. तो १९५५ मध्ये यामाहा मोटर कंपनीच्या स्थापनेपासून सुरू होऊन १९६० पासून जागतिक वाढ आणि नेतृत्व अशा अनेक गोष्टी दाखवत पुढे जातो. या नवसंशोधनाच्या पायावरच यामाहा भारतात आली आणि इथे तिने चार दशके मोटरसायकलिंगच्या संस्कृतीचा अर्थ बदलला. या प्रदर्शनातून यामाहाच्या अभियांत्रिकीमधील सर्वोत्तमता तसेच आपल्या निष्ठावान चाहत्यांशी संबंध साजरा केला गेला आहे. (Yamaha)

(हेही वाचा – Accident News : पुणे – नाशिक महामार्गावर भीषण अपघात ; ९ जणांचा मृत्यू)

शक्तिशाली वायझेडआर-एम१- यामाहाचा मोटोजीपी डीएनए

यामाहाचे मोटोजीपी मशीन असलेली वायझेडआर-एम१ ग्लोबल एक्स्पोमध्ये केंद्रस्थानी आहे. त्यातून यामाहाची शक्ती आणि नावीन्यपूर्णतेप्रति अथक मेहनत दिसून येते. मोटोजीपीमधील ५०० पेक्षा अधिक पोडियम फिनिशेस आणि चॅम्पियनशिप विजय यांच्यासह एम१ प्रेक्षकांना यामाहाच्या रेसिंगमधील शक्तीचा रोमांचक अनुभव देते. फॅबिओ क्वार्टारारो आणि एलेक्स रेन्सचे मोटोजीपी रायडिंग गियर्स तसेच ऑथेंटिक रेसिंग सूट्स, हेल्मेट्स आणि ग्लोव्ह्ज हेही या वेळी प्रदर्शनात आहेत.

यामाहाची वाय/ एआय कॉन्सेप्ट मोटरसायकल : एआय आणि भविष्यासाठीचे डिझाइन

२०२५ भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये एक खास वाय/एआय कॉन्सेप्ट मोटरसायकल पाहायला मिळेल. यात एआय तंत्रज्ञान आणि अद्ययावत डिझाइनचे संयोजन आहे. साय-फाय एनिमे तोक्यो ओव्हरराइडमध्ये दिसलेली ही वाय/एआय कॉन्सेप्ट मोटरसायकल भविष्यात १०० वर्षांनंतर दिसते आणि ती अशा जगात आहे जिथे एआयचा शहरी आयुष्य आणि मोबिलिटीत सहजपणे समावेश केला गेला आहे. वायझेडआर-एम१ने प्रेरित डिझाइनसह ही कॉन्सेप्ट बाइक यामाहाच्या भविष्यातील मोबिलिटीचे दर्शन घडवते.

अॅडव्हेंचर मोटरसायकल्स : ब्लेझ न्यू ट्रेल्स

टूरिंगच्या आघाडीवर या प्रदर्शनात लँडर २५० आणि नवीन टेनेरे ७०० आहेत. त्यातून साहस आणि शोध यांचा विचार केला गेला आहे. लँडर २५० ही एक सुंदर दुहेरी उद्दिष्टांसाठी वापरली जाणारी बाईक आहे आणि त्यातून अद्वितीय टिकाऊपणा आणि नियंत्रण मिळते. त्यामुळे ती ऑफरोड साहस आणि शहरी प्रवासासाठीही उत्तम ठरली आहे. टेनेरे ७०० ही खऱ्या अर्थाने जागतिक बाइक असून ती तिच्या दणकट डिझाइन, विश्वासू हाताळणी आणि अद्वितीय टिकाऊपणासह अत्यंत कठीण प्रवासांसाठी उत्तम आहे. हे दोन्ही मॉडेल्स एकत्रितरित्या यामाहाची प्रवासाला चालना देण्यासाठी, रायडर्सना रोमांच आणि आरामदायीपणा मग खुल्या रस्त्यावर किंवा नवीन मार्गांवर असो देण्यासाठी सज्ज आहेत. (Yamaha)

(हेही वाचा – 8th Pay Commission : आठवा वेतन आयोग नेमका कधी स्थापन होणार? तो कसं काम करणार?)

रेसवर आधारित रोमांच : आर-सिरीज गाड्या

यामाहाचा रेसिंग डीएनए आर१५, आर३ आणि आर७ द्वारे पाहायला मिळतो. आर सिरीज यामाहाच्या सर्वोत्तम मोटरसायकल्सपैकी एक आहे. ती आपल्या क्रांतीकारक तांत्रिक सुधारणा आणि बोल्ड डिझाइन्ससाठी ओळखली जाते. रायडरची कौशल्ये सुधारण्यासाठी तयार झालेली ही रेंज रायडर्सना आपल्या संपूर्ण क्षमता वापरून स्पीडचा रोमांच अनुभवण्यासाठी तसेच त्यांच्या अपेक्षेपेक्षाही जास्त वेगाने जाण्यासाठी सज्ज करते.

एमटी : द डार्क साइड ऑफ जपान

भारत मोबिलिटी ग्‍लोबल एक्‍स्‍पो २०२५ मध्‍ये एमटी-१५, एमटी-०३ आणि एमटी-०९ असलेल्‍या यामाहा एमटी सिरीजचे प्रदर्शन दाखवण्‍यात आले, यासह स्‍पोर्टबाइकमधील उच्‍चस्‍तरीय डिझाइनला नव्‍या उंचीवर नेण्‍यात आले. ‘द डार्क साइड ऑफ जपान’मधून प्रेरित या मोटरसायकल्‍स त्‍यांचे टॉर्क-संपन्‍न इंजिन्‍स, चपळ हाताळणी आणि साहसी, स्ट्रिप-डाऊन आकर्षकतेसह तुम्हाला साहसी राइडचा अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आल्‍या आहेत. एमटी सिरीजमधून साहसी राइडचा शोध घेणा-या राइडर्सना अद्वितीय उत्‍साह व गतीशीलीता देण्‍याप्रती यामाहाची समर्पितता दिसून येते. हे मॉडेल्‍स तुम्‍हाला रात्रीच्‍या वेळी ड्रायव्हिंग करण्‍यास आणि शहरामध्‍ये आपली छाप पाडण्‍यास प्रेरित करतात.

यामाहाची भारतातील पहिली हायब्रिड मोटरसायकल : नवीन २०२५ एफझेड-एस एफआय

कंपनीने यामाहाची भारतातील पहिली हायब्रिड मोटरसायकल – नवीन २०२५ एफझेड-एस एफआय डीएलएक्‍सचे देखील अनावरण केले. सुधारित हेडलॅम्‍प्‍स, डायनॅमिक टँक स्‍टायलिंग आणि नवीन कलर स्किम्‍सह एफझेड-एस एफआय डीएलएक्‍समध्‍ये नवीन प्रगत वैशिष्‍ट्ये आहेत, जसे स्‍मार्ट मोटर जनरेटरसह स्‍टॉप/स्‍टार्ट व हायब्रिड तंत्रज्ञान, ज्‍यामधून शांतमय व सुलभ इंजिन अनुभव मिळतो. कलर टीएफटी इन्‍स्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टरसह टर्न- बाय-टर्न (टीबीटी) नेव्हिगेशन तंत्रज्ञान-अग्रणी सुविधा देतात, तर फ्यूएल टँकवरील एकीकृत टर्न सिंगल आणि अपडेटेड कलर्स मोटरसायकलच्‍या आकर्षकतेमध्‍ये अधिक भर करतात. (Yamaha)

(हेही वाचा – Mahakumbh मध्ये आतापर्यंत 7 कोटींहून अधिक भाविकांचे स्नान)

शहरातील राइडिंगसाठी हायब्रिड मोबिलिटीमध्‍ये अग्रस्‍थानी

हायब्रिड झोनमध्‍ये यामाहाने आपल्‍या १२५ सीसी एफआय ब्‍ल्‍यू कोअर इंजिनसोबत रेझेडआर, फॅशिनो व फिलानो अशा आपल्‍या लोकप्रिय स्‍कूटर्सची श्रेणी देखील दाखवली. स्‍मार्ट मोटर जनरेटर (एसएमजी) तंत्रज्ञानासह सुसज्‍ज या स्‍कूटर्स इंधन कार्यक्षमता व उच्‍च टॉर्क देतात, ज्‍यामधून यामाहाचा शहरी गतीशीलतेप्रती भविष्‍यकालीन दृष्टिकोन दिसून येतो.

जीवनशैलीला कार्यक्षमतेची जोड : ऐरॉक्‍स १५५ आणि एन-मॅक्‍सचा आनंद घ्‍या

यामाहाच्‍या पॅव्हिलियनमध्‍ये वैशिष्‍ट्यपूर्ण उत्‍साहाची भर करत ऐरॉक्स १५५ व्‍हर्जन एस आणि एन-मॅक्‍स परफॉर्मन्‍स स्‍कूटर्स तरूण, डायनॅमिक राइडर्सचे लक्ष वेधून घेण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आल्‍या आहेत. स्‍पोर्टी आकर्षकता व अत्‍याधुनिक इंजीनिअरिंगसह या स्‍कूटर्स शहरी प्रवास आणि वीकेण्‍ड गेटवेजना नव्‍या उंचीवर घेऊन जातात. यामाहाच्‍या प्रतिष्ठित ‘मॅक्‍स डीएनए’मधून प्रेरणा घेत प्रत्‍येक मॉडेल रेझर-शार्प गतीशीलता, उच्‍च दर्जाची हाताळणी आणि प्रतिसादात्‍मक ब्रेकिंग देते, ज्‍यामधून साहसी व रोमांचक, तसेच व्‍यावहारिक राइडिंग अनुभव मिळतो. (Yamaha)

यामाहासह संलग्‍न व्‍हा : जेथे नाविन्‍यता आणि धमाल राइडिंग अनुभव एकत्र मिळतात

यामाहाच्‍या पॅव्हिलियनमध्‍ये ग्राहक सहभाग झोन देखील आहे, जो चाहत्‍यांना आठवणींचा संग्रह करण्‍यासाठी मोटोजीपी गेमिंग अनुभव, विशेष यामाहा अॅक्‍सेसरीज आणि आर१५ सह टिल्‍ट-बाइक अनुभव देतो. यामाहाच्‍या ‘द कॉल ऑफ द ब्‍ल्‍यू’ मोहिमेशी संलग्‍न राहत हे वैविध्‍यपूर्ण पॅव्हिलियन अभ्‍यागातांना ब्रँडच्‍या विश्‍वामध्‍ये सामावून जाण्‍याचे आवाहन करते. अभ्‍यागत मॉन्‍स्‍टर एनर्जी स्‍टॉलचा देखील आनंद घेऊ शकतात आणि ४० इअर्स एक्‍सक्‍लुसिव्‍ह झोनमधील विविध परस्‍परसंवादात्‍मक क्रियाकलापांमध्‍ये सहभाग घेऊ शकतात. मेगा इव्‍हेण्‍टमध्‍ये यामाहाच्‍या सहभागाबात मत व्‍यक्‍त करत यामाहा मोटर इंडियाचे अध्‍यक्ष श्री. इतारू ओटनी म्‍हणाले, ”आम्‍ही भारत मोबिलिटी ग्‍लोबल एक्‍स्‍पो २०२५ मध्‍ये यामाहाच्‍या मोटरसायकल्‍स व स्‍कूटर्सच्‍या उत्‍साहवर्धक प्रदर्शनासह भारतातील आमच्‍या ४० वर्धापन दिनाच्‍या साजरीकरणाला सुरूवात केली.

(हेही वाचा – Chhagan Bhujbal राष्ट्रवादीपासून दूर ? पक्षात दरी वाढल्याची चर्चा)

थीम ‘अस्‍पायरेशन्‍स अनव्‍हील्‍ड’अंतर्गत आम्‍ही अभिमानाने आमची जागतिक उत्‍पादन लाइनअप सादर करत आहोत, ज्‍यामुळे भारतात मोटरसायकलिंगच्‍या भविष्‍याकरिता नवीन शक्‍यतांना चालना मिळेल. हे प्रदर्शन अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाला सादर करते, तसेच या प्रदर्शनामधून भारतातील तरूण राइडर्सच्‍या सर्वसमावेशक गरजांशी संलग्‍न असलेली नाविन्‍यता, कार्यक्षमता आणि स्‍टाइल वितरित करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. आम्‍ही हे आयकॉनिक व प्रगत मॉडेल्‍स दाखवण्‍यासोबत उज्‍ज्‍वल भविष्‍याकडे वाटचाल करत आहोत, जेथे यापैकी अनेक जागतिक उत्‍पादने आमच्‍या भारतातील लाइन-अपमध्‍ये सामील होतील. या सेलिब्रेशनमधून आमचा वारसा, तसेच आगामी वाटचालीप्रती आमचा दृष्टिकोन देखील दिसून येतो.” यामाहा भारत मोबिलिटी ग्‍लोबल एक्‍स्‍पो २०२५ येथे आपला ४० वर्षांचा वारसा साजरा करत असताना नाविन्‍यता, उत्‍साह आणि अद्वितीय गतीशीलता सोल्‍यूशन्‍सच्‍या भविष्‍यासाठी मंच देखील स्‍थापित केला आहे. यामाहा अभ्‍यागतांना आपला वारसा आणि आगामी शक्‍यतांच्‍या परिपूर्ण सुसंगतेचा अनुभव घेण्‍याचे आवाहन करते. (Yamaha)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.