CM Devendra Fadnavis २० ते २४ जानेवारी दरम्यान दावोसमध्ये; महाराष्ट्राच्या गुंतवणुकीसाठी महत्त्वाचा दौरा

46
CM Devendra Fadnavis २० ते २४ जानेवारी दरम्यान दावोसमध्ये; महाराष्ट्राच्या गुंतवणुकीसाठी महत्त्वाचा दौरा
  • प्रतिनिधी

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) हे २० ते २४ जानेवारी या कालावधीत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्यासाठी दावोसला रवाना होणार आहेत. १९ जानेवारीला पहाटे मुंबईतून ते निघतील. महाराष्ट्रात अधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

पहिल्या कार्यकाळातील यशाची पुनरावृत्ती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात तीन वेळा दावोसमध्ये सहभाग घेतला होता. त्या काळात महाराष्ट्र औद्योगिक विकासात पाचव्या क्रमांकावरून थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचला होता. मॅग्नेटिक महाराष्ट्र या गुंतवणूक आकर्षण मोहिमेद्वारे त्यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक आणली होती. यंदाही दावोस दौऱ्यात विविध जागतिक नेत्यांशी आणि औद्योगिक क्षेत्रातील दिग्गजांशी चर्चेसाठी त्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

(हेही वाचा – भाजपा पाठोपाठ NCP Ajit Pawar Group चेही शिर्डीत अधिवेशन, काय चर्चा होणार ?)

दावोस दौर्‍यातील मुख्य उद्दिष्टे

या दौर्‍यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत आणि एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको यांसारख्या संस्थांचे वरिष्ठ अधिकारी असतील. त्यांनी यामध्ये प्रामुख्याने डेटा सेंटर्स, ऑटोमोबाईल्स, सेमिकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स, स्टील, अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्योग, औषधी आणि पायाभूत सुविधा यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

१ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा संकल्प

महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) प्रयत्नशील आहेत. त्यांच्या मते, या दौऱ्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, तर औद्योगिक क्षेत्राला नवा चालना मिळेल.

(हेही वाचा – BMC : जी दक्षिण विभाग कार्यालय आवारातील नागरी सुविधा केंद्राच्या कामकाजाची आयुक्तांनी केली पाहणी)

समतोल विकासावर भर

मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले की, राज्यात गुंतवणूक आणताना प्रादेशिक समतोल राखला जाईल आणि राज्याच्या सर्व भागांत चौफेर विकास होईल, याची दक्षता घेतली जाईल. दावोस दौर्‍यातही याच धोरणाला अनुसरून विविध व्यावसायिक बैठकांमध्ये महाराष्ट्राच्या विकासासाठी जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असेल.

मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रासाठी हा दौरा यशस्वी ठरेल, अशी अपेक्षा राज्य प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.