Saif Ali Khan Attack : समाजमाध्यमावर ‘ट्रोलर्स वॉर’

100
Saif Ali Khan Attack : समाजमाध्यमावर ‘ट्रोलर्स वॉर’
  • खास प्रतिनिधी 

अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर विरोधी पक्षांनी त्याचे राजकारण सुरू केले. समाजमाध्यमावरही या विषयावरून ‘ट्रोलर्स वॉर’ सुरू झाले आहे. शिवसेना उबाठा नेते आदित्य ठाकरे यांनी एक पोस्ट केली तर त्याला नेटकाऱ्यांनी प्रचंड ट्रोल केले. (Saif Ali Khan Attack)

सरकार गुन्हे रोखण्यात अपयशी

आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी १६ जानेवारी २०२४ या दिवशी ‘X’ वर एक पोस्ट करून सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला आणि त्यापाठोपाठ राज्यातील कायदा-सुव्यवस्था कशी बिघडली यावर भाष्य केले. गेल्या तीन वर्षांचा हवाला देत हिट अँड रन प्रकरणे, बीड, परभणीच्या घटना मांडत विद्यमान सरकार गुन्हे रोखण्यात सपशेल अपयशी असल्याचा आरोप केला. (Saif Ali Khan Attack)

(हेही वाचा – Mahakumbh 2025 : कुंभमेळा ही अंधश्रद्धा असल्याचा प्रचार भोवला; नागा साधूंनी कार्यकर्त्यांना चोपले)

सुशांत-दिशाच्या प्रकरणात जेल नाही

यावर एकाने आदित्य यांना उद्देशून ‘बेबी पेंग्विन तुम्ही मोदीजींचे आभार माना की सुशांत सिंह राजपूत आणि दिशाच्या प्रकरणात जेलमध्ये नाही आहात,’ असे मत मांडले आणि ‘भुले नाही ही पालघर’ अशा आशयाचा संदेश देणारे एक पोस्टर पोस्ट केले ज्यामध्ये हिंदू साधूना मारहाण होत आहे. तर एकाने पेंग्विनचा फोटो आणि एकाने पेंग्विनची छोटी क्लिप टाकून ठाकरे यांना ट्रोल केले. (Saif Ali Khan Attack)

उबाठाने तर बोलूच नये

‘ऊबाठाने तर सैफ अली हल्ला विषयावर काही बोलूच नये. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालीयन प्रकरणात तुम्ही काय केले?’ असा प्रश्न केला. बहुतेकांनी आदित्य यांना पालघरचे साधू हत्याकांड, सुशांत सिंह राजपूत, दिशा सालियन यांच्याबद्दलही मत व्यक्त करा, असे सवाल करत ठाकरे यांना जाब विचारला. (Saif Ali Khan Attack)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.