- विशेष प्रतिनिधी, मुंबई
लोअर परळ येथील गणपतराव कदम मार्गावरील अनधिकृत शेड्स, दुकानांसमोरील वाढीव बांधकाम आदींवर मुंबई महानगरपालिकेतर्फे शुक्रवारी निष्कासन कारवाई करण्यात आली. त्यामुळे पदपथ, रस्ता मोकळा झाला आहे. (BMC)
(हेही वाचा – Kasarvadavali-Gaimukh Metro Project च्या खर्चात ६३.६७ कोटींची वाढ; मुदतवाढ एप्रिल २०२५ पर्यंत)
महानगरपालिकेच्या जी दक्षिण विभाग हद्दीतील गणपतराव कदम मार्गावर व्यावसायिक दुकानदार, गाळेधारकांनी वाढीव बांधकाम, अनधिकृत शेड्स उभारल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे पादचारी, वाहनचालक यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. (BMC)
(हेही वाचा – BMC : जी दक्षिण विभाग कार्यालय आवारातील नागरी सुविधा केंद्राच्या कामकाजाची आयुक्तांनी केली पाहणी)
या अतिक्रमणांवर निष्कासनाची कारवाई करण्याचे निर्देश उपायुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे आणि जी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांनी दिले होते. त्यानुसार जी दक्षिण विभागाच्या अतिक्रमण निर्मूलन, परिरक्षण आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली आहे. महानगरपालिकेचे अभियंते, १२ कामगार, दोन मालट्रक आणि पोलीस दलाच्या मदतीने ही कारवाई पार पडली. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community