Russia-Ukraine War मध्ये १२ भारतीयांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

32
Russia-Ukraine War मध्ये १२ भारतीयांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती
Russia-Ukraine War मध्ये १२ भारतीयांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

युक्रेनमध्ये आतापर्यंत रशियाच्या बाजूने लढणाऱ्या १२ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १२६ भारतीय नागरिक रशियन सैन्यात सामील झाल्याची नोंद झाली आहे. त्यापैकी ९६ लोक भारतात परतले आहेत. रशियामध्ये अजूनही १८ भारतीय अडकले असून त्यापैकी १६ बद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यांच्या मायदेशी परतण्यासाठी आम्ही काम करत आहोत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल (Randhir Jaiswal) यांनी दि. १७ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत दिली. (Russia-Ukraine War)

( हेही वाचा : Delhi Assembly Election : मोठ्या पक्षांसाठी लहान पक्ष डोकेदुखी ठरणार

जयस्वाल म्हणाले की, केरळचा रहिवासी बिनील बाबू (Binil Babu) यांचे दुखद निधन झाले आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबियांशी बोललो आहोत. आम्ही रशियन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. बिनिल बाबू (Binil Babu) यांचे पार्थिव लवकरात लवकर परत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही जयस्वाल म्हणाले. तरी भारताने हे प्रकरण रशियाकडे जोरदारपणे मांडले आहे आणि रशियन सैन्यातून सर्व भारतीयांना तात्काळ माघार पाठवण्याची मागणी केली असल्याची माहिती जयस्वाल यांनी दिली. (Russia-Ukraine War)

यातील अनेक जण कामाच्या शोधात रशियाला गेले होते. मात्र त्यांना युद्धासाठी पाठवण्यात आल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. बिनील आणि कुरियन नोकरीच्या शोधात रशियाला गेले होते. जून २०२४ मध्ये ते या युद्धात अडकले. त्यांना युक्रेनच्या हद्दीत रशियन सैनिकांना अन्न पोहोचवण्याचे आणि खंदक खोदण्याचे काम देण्यात आले. तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिसा कन्सल्टन्सी कंपन्या परदेशात काम करण्याची इच्छा दर्शवणाऱ्या लोकांना लक्ष्य करतात. यानंतर त्यांना फसवण्यासाठी यूट्यूब व्हिडिओ बनवले जातात. यात रशियामध्ये (Russia) युद्धाचा कोणताही परिणाम नाही आणि सर्वजण सुरक्षित असल्याचे दाखवण्यात आले. यानंतर, रशियन सैन्यात मदतनीस, लिपिक आणि युद्धात कोसळलेल्या इमारती रिकामी करण्याच्या नोकऱ्यांसाठी रिक्त जागा दर्शविल्या जातात. (Russia-Ukraine War)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.