Delhi Assembly Election मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ३० उमेदवार रिंगणात

32
Delhi Assembly Election मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ३० उमेदवार रिंगणात
Delhi Assembly Election मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ३० उमेदवार रिंगणात
  • प्रतिनिधी 

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वांना आश्चर्यचकित करीत उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 30 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. दिल्लीत 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 8 तारखेला निकाल लागणार आहे. (Delhi Assembly Election)

उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत पक्षाने ३० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) युती सरकारचा मित्रपक्ष आहे. अजित पवार हे स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देखील आहेत. पण, त्यांच्या पक्षाने राजधानी दिल्लीत भाजपासोबत युती केलेली नाही. (Delhi Assembly Election)

(हेही वाचा – आरोग्यमंत्री Prakash Abitkar यांची वरळीच्या कामगार विमा रुग्णालयाला अचानक भेट)

२०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने पाच जागांवर निवडणूक लढवली होती, परंतु राष्ट्रवादीला एकही जागा जिंकण्यात यश आले नाही. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फक्त एकच गट होता आणि या गटाचे नेतृत्व शरद पवार करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) बुरारीमधून रतन त्यागी, बादलीमधून मुलायम सिंह, रिठाळामधून लखन प्रजापती, मंगोलपुरीमधून खेम चंद, चांदणी चौकमधून खालिद उर रहमान यांना तिकीट दिले आहे. याशिवाय, मतिया महलमधून मोहम्मद यांना उमेदवारी दिली आहे. बल्लीमारनमधून जावेद यांना तिकीट दिले आहे. सदरे आलम (मोती नगर), हरीश कुमार (मादीपूर), शब्बीर खान (हरी नगर), मोहम्मद नवीन (जनकपुरी), हमीद (विकासपुरी), विश्वनाथ अग्रवाल (नवी दिल्ली), सुरेंद्र सिंह हुड्डा (कस्तुरबा नगर), मोहम्मद समीर (मालवीय नगर), नरेंद्र तंवर (छत्तरपूर), खेमचंद राजौरा (देवळी-अजा), कमर अहमद (संगम विहार), जमील (कालकाजी), प्रेम खटाना (तुगलकाबाद), इम्रान सैफी (बदरपूर), नमाहा (लक्ष्मी नगर), दानिश अली (कृष्णा नगर), राजेंद्र पाल (शाहदरा), राजेश लोहिया (सीमापुरी-अजा), अभिषेक (रोहतास नगर), मेहक डोगरा (गोंडा), जगदीश भगत (गोकुळपूर-अजा) आणि संजय मिश्रा (करावल नगर) यांना उमेदवारी दिली आहे. (Delhi Assembly Election)

दिल्लीतील सर्व ७० विधानसभा जागांसाठी ५ फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणुकीचे निकाल ८ फेब्रुवारी रोजी जाहीर होतील. निवडणूक आयोगाच्या मते, दिल्लीत एकूण १.५५ कोटी मतदार आहेत. यात ८३,४९,६४५ पुरुष आणि ७१,७३,९५२ महिला आणि १,२६१ तृतीयपंथी मतदार आहेत. (Delhi Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.