Bangladeshi Infiltrators : एकट्या मुंबईत पंधरा दिवसात ११२ घुसखोर बांगलादेशी नागरिकांवर कारवाई

115
Bangladeshi Infiltrators : एकट्या मुंबईत पंधरा दिवसात ११२ घुसखोर बांगलादेशी नागरिकांवर कारवाई 
Bangladeshi Infiltrators : एकट्या मुंबईत पंधरा दिवसात ११२ घुसखोर बांगलादेशी नागरिकांवर कारवाई 
घुसखोर बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे,या घुसखोरांवर कारवाई करण्यासाठी  सरकारने कडक पाऊले उचली आहे. मागील काही महिण्यापासून राज्यात घुसखोरी करून राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची धरपकड करण्यात येत आहे.मागील १५ दिवसात एकट्या मुंबईतुन जवळपास ११२ घुसखोर बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.मागील काही वर्षातील ही मोठी कारवाई असून ही कारवाई कायम असणार असल्याची माहिती एका पोलीस अधिकारी यांनी दिली आहे. (Bangladeshi Infiltrators)
भारतात घुसखोर बांगलादेशी नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, ही बाब भारतासाठी चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. बोगस कागदपत्राच्या आधारे  राहणाऱ्या घुसखोर बांगलादेशीनी मागील काही निवडणुका मध्ये मतदान केल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर  या घुसखोरावर कारवाई करण्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारने मोठी पाऊले उचलली आहे. (Bangladeshi Infiltrators)
महाराष्ट्र सरकारने मागील काही महिण्यात राज्यात घुसखोर बांगलादेशी नागरिकावरील कारवाई तीव्र केली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यात घुसखोर बांगलादेशी विरुद्ध कारवाईला गती आली आहे. मुंबई पोलीस तसेच राज्य दहशतवाद विरोधी पथक आणि मुंबई गुन्हे शाखेने मागील १५ दिवसांमध्ये मुंबईतील विविध भागातुन जवळपास ११२ घुसखोर बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली आहे, या कारवाईत ५६ गुन्हे दाखल करण्यात आले असून अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकामध्ये ८६ पुरुष आणि २६ महिलांचा समावेश असल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली आहे.
मुंबईत मागील तीन वर्षात जवळपास ३७८ बांगलादेशी नागरिकांची धरपकड करण्यात आली होती, मागील तीन वर्षाच्या  तुलनेत २०२५ च्या सुरुवातीच्या १५ दिवसात केलेली कारवाई  ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. (Bangladeshi Infiltrators)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.