Bangladeshi Infiltrators : गेली दहा वर्षे बांगलादेशी नागरिकाचा पुण्यात कापड व्यवसाय; अखेर पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या

75
Bangladeshi Infiltrators : गेली दहा वर्षे बांगलादेशी नागरिकाचा पुण्यात कापड व्यवसाय; अखेर पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Bangladeshi Infiltrators : गेली दहा वर्षे बांगलादेशी नागरिकाचा पुण्यात कापड व्यवसाय; अखेर पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या

बनावट आधार कार्ड, पारपत्राआधारे गेली दहा वर्षे बांगलादेशी नागरिक (Bangladeshi Infiltrators) पुण्यात बेकायदेशीर राहून कापड व्यवसाय करत असल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित बांगलादेशी नागरिकाला स्वारगेट पोलिसांनी महर्षीनगर भागात पकडले आहे. त्याच्याकडून बनावट आधार कार्ड (Aadhar card), पारपत्र (Passport), मतदान ओळखपत्र (Voter ID card), पॅनकार्ड जप्त करण्यात आले. त्याने बनावट कागदपत्रे कशा पद्धतीने मिळवली यादृष्टीने पोलिस (Pune Police) तपास करत आहेत. (Bangladeshi Infiltrators)

हेही वाचा-पुणे महापालिका खरेदी करणार ‘Mental Health App’

याप्रकरणी एहसान हाफिज शेख (Ehsan Hafiz Shaikh) (३४, सध्या रा. अरुणा असिफ अली उद्यानाजवळ, महर्षीनगर, गुलटेकडी, मूळ रा. बांगलादेश) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात परकीय नागरिक कायदा कलम १४, पारपत्र अधिनियम, परकीय नागरिक आदेश तसेच बनावट कागदपत्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस हवालदार सोमनाथ ढगे यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात फिर्याद दिली. (Bangladeshi Infiltrators)

हेही वाचा-Uttar Pradesh मध्ये धर्मांधांने केली काश्मिरी पंडिताची हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एहसान शेख हा कापड विक्रीचा व्यवसाय करत होता. २०१४ मध्ये त्याने भारतात बेकायदेशीर घुसखोरी केली. त्यानंतर तो पुण्यात वास्तव्याला आला होता. काही वर्षांपूर्वी त्याने कपडे विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. स्वारगेट पोलिसांच्या पथकाला याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने महर्षीनगर परिसरात सापळा लावून शेखला ताब्यात घेतले. (Bangladeshi Infiltrators)

हेही वाचा-दरवर्षी ५ हजार लालपरी बसेस खरेदी करण्याचा ST Corporation चा निर्णय

एहसान हाफिज शेख याची चौकशी केली असता, त्याच्याकडून बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, पारपत्र जप्त करण्यात आले. त्याने बनावट कागदपत्रे कशी मिळवली यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. दरम्यान, पुण्यात पकडण्यात आलेला बांगलादेशी हा प्रथम पश्चिम बंगाल, नंतर विविध ठिकाणी राहून पुण्यात आला होता. अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. (Bangladeshi Infiltrators)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.