NCP Politics : राष्ट्रवादीच्या नवसंकल्प शिबिराला ‘लिमिटेड’ पदाधिकाऱ्यांना निमंत्रण; विदर्भातील नाराजी उफाळली

41
NCP Politics : राष्ट्रवादीच्या नवसंकल्प शिबिराला 'लिमिटेड' पदाधिकाऱ्यांना निमंत्रण; विदर्भातील नाराजी उफाळली
NCP Politics : राष्ट्रवादीच्या नवसंकल्प शिबिराला 'लिमिटेड' पदाधिकाऱ्यांना निमंत्रण; विदर्भातील नाराजी उफाळली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डीत होणाऱ्या दोन दिवसीय नवसंकल्प शिबिरासाठी विदर्भातील फक्त मोजक्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण मिळाल्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. या अधिवेशनासाठी विदर्भातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांना वगळण्यात आल्याने पक्षात नाराजीचा सूर अधिकच उफाळला आहे. (NCP Politics)

फक्त चार पदाधिकाऱ्यांना निमंत्रण

नागपूर जिल्ह्यातून फक्त चार पदाधिकारी—प्रशांत पवार (नागपूर शहराध्यक्ष), बाबा गुजर (जिल्हाध्यक्ष), श्रीकांत शिवणकर (शहर कार्याध्यक्ष), आणि अनिल अहीरकर (प्रदेश उपाध्यक्ष)—यांना शिर्डी अधिवेशनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, इतर पदाधिकाऱ्यांना निमंत्रण न मिळाल्याने त्यांच्या नाराजीला तोंड फुटले आहे.  (NCP Politics)

(हेही वाचा- Bhaskar Jadhav उबाठा गटाला देणार दणका; शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता)

नाराज पदाधिकाऱ्यांचा सवाल

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भात चांगले यश मिळवले होते. सात उमेदवारांपैकी सहा उमेदवार विजयी झाले होते. विदर्भातील पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे “आमची गरज संपताच आम्हाला वगळले का?” असा सवाल नाराज पदाधिकाऱ्यांकडून विचारला जात आहे. (NCP Politics)

अजित पवारांशी थेट संपर्क

निमंत्रण न मिळालेल्या काही पदाधिकाऱ्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून आपली नाराजी व्यक्त केली. यावर पवारांनी काहींना तोंडी निमंत्रण दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शिबिरासाठी अधिकृत निमंत्रणाशिवाय इतरांना सोबत आणू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. (NCP Politics)

(हेही वाचा- Virat Kohli : विराट कोहलीचा दिल्ली रणजी संघात समावेश, दुखापतीमुळे खेळण्याविषयी अनिश्चितता कायम)

गटबाजीची शक्यता वाढली

विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद तुलनेने कमी असतानाही स्थानिक नेत्यांमध्ये गटबाजी उफाळल्याचे दिसत आहे. पूर्व विदर्भातील एका नेत्याने फक्त आपल्या जवळच्या पदाधिकाऱ्यांनाच अधिवेशनासाठी बोलावल्याचा आरोप काही नेत्यांनी केला आहे. (NCP Politics)

महापालिका निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता

महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर असताना अशा गटबाजीमुळे पक्षाची संघटनात्मक बांधणी कमकुवत होण्याची भीती आहे. विदर्भात पक्षाच्या बळकटीसाठी प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलणे, हे पक्षाच्या आगामी निवडणुकीतील यशावर परिणाम करू शकते. (NCP Politics)

(हेही वाचा- शिवसेना उबाठाला कोकणात मोठा धक्का; Kankavli Assembly संपर्कप्रमुखांचा राजीनामा)

नाराजीचा मुद्दा अधिवेशनात येण्याची शक्यता

शिर्डीच्या नवसंकल्प शिबिरात विदर्भातील या नाराजीचा मुद्दा चर्चेला येण्याची शक्यता आहे. पक्षनेतृत्वाने याबाबत योग्य पावले उचलली नाहीत, तर विदर्भातील नाराजी पक्षासाठी मोठे आव्हान ठरू शकते.  (NCP Politics)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.