१५ जानेवारी या ऐतिहासिक दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाच्या माझगाव डॉक येथे ‘आय.एन्.एस्. सूरत’, ‘आय.एन्.एस्. निलगिरी’ या युद्धनौका (Warship) आणि ‘आय.एन्.एस्.’ वाघशीर या पाणबुडीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण केले. याआधी माझगाव डॉक येथील मुख्य प्रबंधक विज्ञानेश मासावकर यांचा युद्धनौका बांधणीत महत्वाची भूमिका बजावल्याने तसेच या कार्यात विशेष योगदान दिल्याबद्दल त्यांचा विशेष पदक देवून सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमप्रसंगी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन्, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नौदलाचे अधिकारी उपस्थित होते. भारतीय नौदलासाठी हा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावा, असा आहे. एकाच दिवशी २ युद्धनौका (Warship) आणि १ पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात सामील होण्याची ही पहिलीच वेळ होती.
यामध्ये माझगाव डॉक येथील मुख्य प्रबंधक विज्ञानेश शंकर मासावकर यांनी ‘आय.एन्.एस्. निलगिरी’ या युद्धनौकेच्या बांधणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली असून त्यांच्या कारकिर्दीत भारतीय नौदलासाठी ही सहावी युद्धनौका (Warship) आहे. विज्ञानेश मासावकर हे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सदस्य आहेत, तसेच ते स्मारकाच्या कार्यकारिणीचेही सदस्य आहेत.
‘आय.एन्.एस्. निलगिरी’ या युद्धनौकेच्या बांधकामात विज्ञानेश शंकर मासावकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ही नौका भारतीय नौदलासाठी त्यांच्याच नेतृत्वाखाली तयार झालेली सहावी युद्धनौका आहे. विज्ञानेश मासावकर यांची तंत्रज्ञानावरील पकड आणि कामातील निष्ठा यामुळे ही युद्धनौका आधुनिक तंत्रज्ञान आणि क्षमता असलेली ठरली आहे.
आय.एन्.एस्. सूरत, निलगिरी, आणि वाघशीर यांची तांत्रिक प्रगती आणि युद्धसज्जता भारताच्या संरक्षण क्षमतेला नवा आयाम देत आहे. या ऐतिहासिक घटनेने भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे स्वप्न आणखी मजबूत झाले आहे. विज्ञानेश मासावकर यांच्या रूपाने देशाला मिळालेला हा ठेवा भारतीय नौदलाचा आणि संपूर्ण देशवासियांचा अभिमान आहे.
‘आय.एन्.एस्. मुरमुगाओ’ या युद्धनौके (Warship) च्या बांधणीसाठी आणि त्याच्या विशेष योगदानासाठी नौदल प्रमुख ॲडमिरल करमबीर सिंह आणि नौदल प्रमुख (निवृत्त) ॲडमिरल आर हरी कुमार यांनी विज्ञानेश शंकर मासावकर यांचा विशेष पदक देवून सन्मानित केला. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही मासावकर यांचे अभिनंदन केले.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community