Tata Mumbai Marathon 2025: ‘या’ वाहतूक मार्गात बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग…

94

आशियातील सर्वात मोठ्या टाटा मुंबई मॅरेथॉन (Tata Mumbai Marathon 2025) रविवार, 19 जानेवारी रोजी होणार आहे. त्याची जय्यत तयारी सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत होणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये (Tata Marathon) मोठ्या संख्येने लोक सहभागी होणार आहेत. दरम्यान या मॅरेथॉनमुळे अनेक वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले. या मॅरेथॉनसाठी यंदा 13 हजाराहून अधिक धावपटू धावण्यासाठी तयार आहेत. विशेष म्हणजे या टाटा मुंबई मॅरेथॉन 2025 साठी मध्य रेल्वे प्रशासनानेही पुढाकार घेतला आहे. त्यानुसार मध्य रेल्वे टाटा मुंबई मॅरेथॉन 2025 साठी विशेष लोकल (Tata Marathon Special local train) चालवणार आहे. (Tata Mumbai Marathon 2025)

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहतीनुसार, मॅरेथॉन मार्ग एमआरए, आझाद मैदान, काळबादेवी, डी.बी. मार्ग, मलबार हिल, वरळी, वांद्रे, दादर आणि माहीम यासारख्या प्रमुख भागातून जाते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. तसेच, वाहतूक व्यवस्थेवरील संभाव्य ताण कमी करण्यासाठी वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार; Ashish Shelar यांची घोषणा)

मॅरेथॉन सुलभ करण्यासाठी 19 जानेवारी 2025 रोजी पहाटे 3.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. मॅरेथॉन मार्गावरील रस्ते सामान्य वाहतुकीसाठी बंद असतील. तर आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवा वाहनांना प्रवेश असेल. याव्यतिरिक्त, दक्षिण मुंबईत पहाटे 2.00 वाजल्यापासून 24 तासांसाठी जड वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.