छत्तीसगड रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) ने दुर्ग रेल्वे स्थानकातून ताब्यात घेण्यात आलेल्या एका संशयित हा सैफअली खान वर हल्ला करणारा हल्लेखोर असल्याचा दावा केला आहे.मुंबई पोलिसांचे एक पथक या संशयिताचा ताबा घेण्यासाठी छत्तीसगडमध्ये दाखल झाले असून त्यांनी संशयिताला ताब्यात घेऊन चौकशीसाठी त्याला मुंबईत आणले जात आहे. (Saif Ali Khan)
(हेही वाचा- BMC : महापालिका मुख्यालयाला टँकरद्वारे पाणी पुरवठा; पिण्याच्या पाण्याचा वापर फ्लशिंगकरता)
अभिनेता सैफअली खान वर त्याच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्या आरोपीच्या शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेचे ३५ पथके कामाला लागली आहे. मागील ४८ तासात या पथकांनी जवळपास ३० ते ३५ संशयितांची चौकशी केली आहे, मात्र हल्लेखोराला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.दरम्यान तपास पथकाला हल्लेखोर हा कपडे बदलून आपली ओळख लपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळुन आले आहे आहे. (Saif Ali Khan)
दादर पश्चिम कबुतरखाना या ठिकाणी असलेल्या एका मोबाईल फोनच्या दुकानात हल्लेखोर हेडफोन घेण्यासाठी शुक्रवारी गेला होता, त्यानंतर तो दादर रेल्वे स्थानकाच्या दिशेने गेला असल्याचे सीसीटीव्ही फुटेज तपास पथकाच्या हाती लागले होते. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी हल्लेखोराचा शोध घेतला असता हल्लेखोर हा ज्ञानेश्वर एक्सप्रेस ने छत्तीसगडच्या दिशेने गेला असल्याचे आढळून आले.दरम्यान तपास पथकाने राजनांदगाव रेल्वे सुरक्षा बल च्या अधिकारी यांना सूचना देण्यात आली. (Saif Ali Khan)
शनिवारी राजनांदगाव रेल्वे सुरक्षा बलाने दुर्ग रेल्वे स्थानकातून एका संशयिताला ताब्यात घेतले, रेल्वे पोलिसांनी या संशयिताचे फोटो मुंबई पोलिसांना पाठविले असता मुंबई पोलिसांनी त्याला संशयिताला ओळखले असून त्याचा ताबा घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक छत्तीसगड येथे येत असल्याची माहिती राजनांदगाव रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी यांनी दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेला संशयित व्यक्तीचे नाव आकाश कैलास कनोजिया (३१) असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Saif Ali Khan)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community