मुंबईकरांना BEST Electricity चा झटका; तब्बल १५ टक्क्यांनी महागणार वीज

76

शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत वीजपुरवठा करणाऱ्या बेस्ट (Best), टाटा पॉवर (Tata Power) आणि अदानी इलेक्ट्रिसिटी (Adani Electricity) यांनी वीज नियामक आयोगाकडे पुढील पाच वर्षासाठीचे दरवाढीचे प्रस्ताव दाखल केले आहेत. बेस्टने १५ टक्के वाढ सुचविल्याने बेस्टच्या ग्राहकांना नव्या वर्षातच लाइट बिल जादा येणार आहे. टाटा आणि अदानी यांनी एका वर्षापुरता ग्राहकांना दिलासा दिला असला तरी पुढील वर्षापासून या दोन्ही वीजपुरवठादार कंपन्यांच्या ग्राहकांचा लाइट बिलाचा आकडा फुगणार आहे. तीनही कंपन्यांचे नवे वीजदर (Electricity price hike) मार्चमध्ये जाहीर होऊन एप्रिलमध्ये लागू होतील. (BEST Electricity)

वीज कंपन्यांची प्रत्येकी पाच वर्षांनी वीज दर निश्चिती होते, त्याला मल्टी इयर टेरिफ असे म्हणतात. पाचवे वर्ष संपत आले की वीज कंपन्या निर्मिती, वितरण, पारेषण खर्चानुसार महसुली गरज पूर्ण करण्यासाठी वीजदर याचिका आयोगाकडे दाखल करतात. ग्राहकांना दरवाढीच्या प्रस्तावांवर १० फेब्रुवारीपर्यंत सूचना आणि हरकती दाखल करता येणार आहेत.

(हेही वाचा – Saif Ali Khan हल्ला प्रकरण-छत्तीसगड मधून एक जण ताब्यात)

दर कमी होणार नाहीत

बेस्ट आणि टाटा चेंबूरच्या वीज निर्मिती केंद्रातून वीज घेतात. ही वीज खूप महाग आहे. मुंबईकरांना कमी दरात वीज द्यायची असेल तर मुंबईबाहेरून स्वस्तात वीज आणावी लागेल. मात्र मुंबईत वीज आणणाऱ्या वाहिन्यांची क्षमता संपली आहे. ही क्षमता वाढविल्याशिवाय बाहेरून वीज मुंबईत आणता येणार नाही आणि त्याशिवाय विजेचे दर कमी करता येणार नाहीत.

कोणाचे किती ग्राहक?
अदानी – ३१.५० लाख
बेस्ट –  १०.५० लाख
टाटा – ७.५० लाख

(हेही वाचा – BMC : महापालिका मुख्यालयाला टँकरद्वारे पाणी पुरवठा; पिण्याच्या पाण्याचा वापर फ्लशिंगकरता)

२०२५-२६ मध्ये ग्राहकांना सरासरी १५ टक्के दर कपातीचा फायदा मिळेल. तर हरित ऊर्जादरांमध्ये ५० टक्के कपातीचा प्रस्ताव आहे. हे दर प्रति युनिट मागे ६६ पैशांवरून ३० पैसे कमी होतील, असे अदानी इलेक्ट्रिसिटीने सांगितले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.