SSC & HSC Board Exam 2025 : परीक्षा मंडळाचा ‘जात प्रवर्ग’चा निर्णय अखेर रद्द; नवे हॉल तिकीट मिळणार!

51
SSC & HSC Board Exam 2025 : परीक्षा मंडळाचा 'जात प्रवर्ग'चा निर्णय अखेर रद्द; नवे हॉल तिकीट मिळणार!
SSC & HSC Board Exam 2025 : परीक्षा मंडळाचा 'जात प्रवर्ग'चा निर्णय अखेर रद्द; नवे हॉल तिकीट मिळणार!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Board Exam) घेण्यात येणाऱ्या फेब्रुवारी-मार्च 2025 (SSC & HSC Board Exam 2025 ) च्या दाहवी- बारावीच्या परीक्षांच्या प्रवेशपत्रावर (Hall Ticket) विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला होता. दहावी, बारावी परीक्षांच्या प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख केल्याने समाजातील सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्यानंतर शनिवारी मंडळाने माघार घेत ही प्रवेशपत्रेच रद्द केली. (SSC & HSC Board Exam 2025 )

हेही वाचा-Donald Trump 2.0 : डोनाल्ड ट्रंप यांच्या पदग्रहणासाठी मुकेश, नीता अंबानी हजर राहणार

आता जातीचा उल्लेख काढून नवीन प्रवेशपत्रे दिली जाणार आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले असून, त्यावर विभागीय मंडळाचे नाव, कनिष्ठ महाविद्यालय, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, लिंग, आईचे नाव, विद्याशाखा, अपंगत्व, बैठक क्रमांक, केंद्र क्रमांक, केंद्राचे नाव यासह यंदा प्रथमच जात प्रवर्ग नमूद केला होता. (SSC & HSC Board Exam 2025 )

हेही वाचा-UBT गटाच्या २०० हून अधिक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

दहावी, बारावीच्या प्रवेशपत्रावर जात प्रवर्गाचा उल्लेख, ही अयोग्य आणि अनावश्यक बाब असल्याचा आक्षेप अनेकांनी नोंदविला. समाजमाध्यमांमधूनही यासंदर्भात टीकेची झोड उठल्यानंतर ही प्रवेशपत्रे रद्द करण्यात आली. (SSC & HSC Board Exam 2025 )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.