बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif ali khan) हल्ला करणार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या कचाट्यात सापडला आहे. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. आरोपीचे नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहिजाद (३३) असे असून तो बांगलादेशी नागरिक (Bangladeshi infiltrator) (शरीफुल इस्लाम शहजाद मो. रोहिल्ला अमीन फकीर वय ३० वर्षे रा.ठि. ग्राम राजाबरीया, थाना नॉलसिटी, जि झलोकाठी, बांग्लादेश) असल्याची माहिती समोर आली आहे, ६ महिन्यांपूर्वी त्याने भारतात घुसखोरी करून राहत होता, मुंबईत तो हाऊसकिपीग चे काम करीत होता. (Saif ali khan)
हेही वाचा-Saif ali khan वर हल्ला करणारा अखेर पोलिसांच्या ताब्यात; ठाण्यातून अटक
१५ दिवसांपूर्वी आरोपी गावी जाऊन पुन्हा मुंबईत आला होता, त्याने सैफ यांच्या घरी हाऊसकिपीग स्टाफ सोबत काही दिवस काम केले होते. त्याने अवैधरित्या भारतात प्रवेश केलेला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला आहे. सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक केल्यानंतर आज सकाळी 9 वाजता डीसीपी दीक्षित गेडाम यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत डीसीपी दीक्षित गेडाम यांनी संपूर्ण माहिती दिली. (Saif ali khan)
हेही वाचा-SSC & HSC Board Exam 2025 : परीक्षा मंडळाचा ‘जात प्रवर्ग’चा निर्णय अखेर रद्द; नवे हॉल तिकीट मिळणार!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी १६ जानेवारी २०२५ रोजी वांद्रे पोलीस स्टेशनच्या (Bandra Police Station) हद्दीत अभिनेता सैफ अली खानवर यांच्या घरी जबरी चोरी आणि हल्ल्याची जी घटना झाली, त्या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. जबरी चोरीच्या उद्देशाने आरोपीने घरात प्रवेश केला होता. सैफ अली खान प्रकरणी अटक केलेला आरोपी हा बांगलादेशी आहे. त्याच्याकडे भारतीय असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. या आरोपीला न्यायलयात दाखल करुन त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहोत. यानंतर पुढील चौकशी करणार आहोत. या आरोपीला आम्ही अटक केल्यानंतर त्याची उत्तर आणि त्याच्याकडे जे काही साहित्य मिळालेले आहे, त्या अनुषंगाने प्रथम दर्शनी असे वाटतंय की तो बांगलादेशी नागरिक आहे. सध्या आम्ही याचा पुढील तपास करत आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली. (Saif ali khan)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community