-
ऋजुता लुकतुके
सोनी टीव्हीने बिग बॉस ओटीटी हा विशेष कार्यक्रम तीन वर्षांपूर्वी लाँच केला. फक्त सोनी लिव्हवर त्याचं प्रक्षेपण होतं. २०२४ च्या हंगामात बिग बॉस ओटीटीचा एक स्पर्धक होता रणवीर शौरी. सुरुवातीच्या मुलाखतींमध्ये रणवीर म्हणाला होता की, त्याच्याकडे सध्या काम नाही. म्हणून तो या रियालिटी शोमध्ये आला. इथे लोकांच्या नजरेसमोर आल्यावर त्यातून कामाची संधी मिळेल अशी त्याची अपेक्षा त्याने थेट बोलून दाखवली होती. (Ranvir Shorey Net Worth)
त्या शोमधील त्याचं रुपही दाढी वाढलेलं आणि वय वाढलेलं असं होतं. पण, काम नसल्याची तक्रार करणारा रणवीर शौरी काही साधासुधा इसम नाही. यापूर्वी एमटीव्हीमध्ये आरजे म्हणून आणि चित्रपटातही त्याने काही भूमिका गाजवल्या आहेत. आणि त्याचा बँक बॅलन्सही त्यामुळे तगडा आहे. (Ranvir Shorey Net Worth)
बिग बॉस ओटीटी ३ चा विजेता साना मकबूलपेक्षा रणवीरची मिळकत कितीतरी जास्त आहे. पंजाबच्या जालंधरमध्ये जन्म झालेल्या रणवीरचे वडीलही चित्रपट निर्माते होते. शाळा आणि कॉलेजपासून रणवीरला अभिनयात रस होता. आणि त्याने शिक्षण पूर्ण केल्यावर काम शोधायला सुरुवात केली. चित्रपटात तर लवकर संधी मिळाली नाही. पण, एमटीव्हीच्या ऑडिशनमध्ये तो लगेच पास झाला. विनय पाठकबरोबर त्याची जोडी जमली. आणि अनेक शो त्याने गाजवले. हळू हळू खोसला का घोसला या चित्रपटातून त्याने या क्षेत्रातही ओळख कमावली. आजा नचले, छोटीसी लव्ह स्टोरी असे त्याचे सिनेमे गाजले. (Ranvir Shorey Net Worth)
(हेही वाचा- Saif ali khan वर हल्ला करणारा हल्लेखोर निघाला बांगलादेशी घुसखोर; पोलिसांकडून खुलासा)
त्याच्या जोरावर त्याने तगडा बँक बॅलन्स कमावला आहे. रिपब्लिक टीव्हीच्या माहितीनुसार रणवीर शौरीची एकूण कमाई ३७.३४ लाख रुपये इतकी आहे. त्याला रेसिंग कारचाही शौक आहे. त्यामुळे त्याच्या ताफ्यात काही अत्याधुनिक गाड्या आहेत. आणि मुंबईसह पंजाबमध्ये त्याने जागांमध्ये गुंतवणूक केली आहे. (Ranvir Shorey Net Worth)