Wankhede Stadium ला 50 वर्षे पूर्ण; स्टेडियम मागचा इतिहास काय ? वाचा सविस्तर …

63
Wankhede Stadium ला 50 वर्षे पूर्ण; स्टेडियम मागचा इतिहास काय ? वाचा सविस्तर …
Wankhede Stadium ला 50 वर्षे पूर्ण; स्टेडियम मागचा इतिहास काय ? वाचा सविस्तर …

वानखेडे स्टेडियमला (Wankhede Stadium) ५० वर्षे पूर्ण होत आहेत. भारताच्या क्रिकेट इतिहासामध्ये ज्या मोजक्या ग्राऊंडचे नाव घेतले जाते त्यामध्ये वानखेडे स्टेडियमचे नाव हे अग्रक्रमाने घेतले जाते. एका मराठी माणसाच्या दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर या स्टेडियमची उभारणी झाली आहे. मराठी माणसाचा झालेला अपमानाचा एकप्रकारे घोट गिळून हे महत्त्वाकांक्षी मैदान तयार झाले. या स्टेडियमलासुद्धा त्यांचेच नाव देण्यात आले. या ग्राऊंडला ​​एसके वानखेडे (SK Wankhede) यांचे नाव देण्यात आले ज्यांचा या स्टेडियमच्या उभारणीत मोलाचा वाटा आहे. शेषराव कृष्णराव वानखेडे (Sheshrao Krishnarao Wankhede) (२४ सप्टेंबर १९१४ – ३० जानेवारी १९८८) हे क्रिकेट प्रशासक आणि राजकारणी होते. (Wankhede Stadium)

वानखेडे स्टेडियमागचा इतिहास काय ?
७० च्या दशकात मुंबईमध्ये क्रिकेटचा कारभार सांभाळणारी संस्था होती बीसीए (BCA) म्हणजे बॉम्बे क्रिकेट असोसिएशन. ज्याला आता एमसीए म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणतात. सीसीआय आणि बीसीएमध्ये बिलकुल सामंजस्य नव्हतं. ‘इंग्रज गेले पण आता आम्ही नवे इंग्रज’ असा थाट सीसीएचा होता. आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांच्या वेळी सीसीआय आणि बीसीए यांनी स्टेडियममधील जागा कशा वाटून घ्याव्यात, याच्यावर नेहमी वाद व्हायचे. खटके वाढू लागल्यानंतर बीसीएने नवं स्टेडियम बांधायचं ठरवलं अन् ते फक्त ब्रेबॉर्न स्टेडियमपासून ५०० मीटर अंतरावर. पण खरंतर वानखेडे स्टेडियम उभारलं ते म्हणजे मराठी माणसाच्या अपमानातून. (Wankhede Stadium)

वानखेडे स्टेडियम 1974 मध्ये बांधले गेले, ब्रेबॉर्न स्टेडियमचे व्यवस्थापन करणारे बॉम्बे क्रिकेट असोसिएशन (BCA) आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया यांच्यातील वादानंतर ते बांधण्यात आले. यावर उपाय म्हणून BCA ने 45,000 आसन क्षमता असलेले वानखेडे स्टेडियम फक्त एक मैल अंतरावर बांधले गेले आहे. या स्टेडियमच्या उभारणीत बेब्रॉर्न स्टेडियमचे अध्यक्ष विजय मर्चंट आणि शेषराव वानखेडे यांच्या वादाची किनार आहे. या वादानंतरच अगदी बेब्रॉर्न स्टेडियमच्या अगदी जवळ या स्टेडियमची उभारणी झाली. (Wankhede Stadium)

या ऐतिहासिक स्टेड़ियमची निर्मिती
१९७२ मध्ये बॅरिस्टर शेषराव वानखेडे हे महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष होते. विदर्भामध्ये जन्मलेले वानखेडे हे क्रिकेटप्रेमी होतेच पण बीसीएचे अध्यक्षही होते. त्यांच्याकडे काही तरूण आमदार बेलिफेट मॅचचा प्रस्ताव घेऊन आले. शेषराव वानखेडे यांना ही कल्पना आवडली आणि त्यांनी ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्याचं ठरवलं. त्यावेळेस सीसीएचे अध्यक्ष होते ख्यातनाम क्रिकेटपटू विजय मर्चंट. वानखेडेंसह आमदारांचे शिष्टमंडळ मर्चंट यांची भेट घेण्यासाठी गेले. पण मर्चंट यांनी ही मागणी फेटाळून लावली. शब्दाला शब्द लागला आणि वातावरणही गरम झालं. त्यानंतर वानखेडे यांनी निश्चय करीत अगदी नाकावर टिच्चून ब्रेबॉर्न स्टेडियमच्या जवळच या ऐतिहासिक स्टेड़ियमची निर्मिती केली. (Wankhede Stadium)

पहिला कसोटी सामना
याच ग्राऊंडवर 1974-75 साली पहिला कसोटी सामना खेळला गेला. भारत विरुद्ध वेस्ट इंडिजशी हा सामना झाला होता. त्या सामन्यात, क्लाइव्ह लॉईडने नाबाद २४२ धावा केल्या आणि भारताचा दिग्गज कर्णधार मन्सूर अली खान पतौडी यांच्यासाठी अंतिम कसोटी ठरली. वानखेडेवर भारताचा पहिला विजय दोन सत्रांनंतर न्यूझीलंडविरुद्ध मिळाला. गेल्या काही वर्षांत वानखेडेने अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार बनवले आहेत. (Wankhede Stadium)

असे असणार कार्यक्रमाचे स्वरूप
वानखेडेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत, या निमित्ताने मुंबईला प्रेजेंट केलेले भारतीय संघाचे कर्णधार राहिलेल्या 8 कर्णधारांना येथे बोलावण्यात येणार आहे. त्याच बरोबर BCCI तथा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे 3 माजी अध्यक्ष यांचा देखील सत्कार येथे होणार आहे. यामध्ये वानखेडे स्टेडियमचा इतिहास सांगणाऱ्या कॉफी टेबल बुकचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. कॉफी टेबल बुकद्वारे वानखेडे स्टेडियमचा इतिहास सर्वांना माहिती होणार आहे. यामध्ये ICC चे माजी अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आशिष शेलार यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच, देशाचा दिग्गज फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, अजिंक्य रहाणे या दिग्गज खेळाडूंसह माजी कर्णधारांचे सत्कार करण्यात येणार आहेत. (Wankhede Stadium)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.