गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठा बदल होत आहे. काही भागात थंडी तर काही भागात गर्मी जाणवत आहे. त्यामुळे येत्या काही दिवस राज्यात थंडीसह तापमान (temperature) देखील वाढणार आहे. तर काही भागात ढगाळ हवामान (weather) राहणार आहे. (Weather Update)
आयएमडीच्या अहवालानुसार (IMD report), सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती आसाम आणि त्याच्या परिसरात सक्रिय झाली असून गुजरातपासून राजस्थानसह बंगालच्या उपसागरात नैऋत्य भागात पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे वायव्य भागात पश्चिम वाऱ्याचा झोत वाहत असल्याने थंडी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर उत्तर भारतात थंडीचा कडाका अजूनही जाणवत असल्याने त्याचा परिणाम आता राज्यातील हवामानावर होत आहे. त्यामुळे राज्यात पुढील काही दिवस गारठा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
(हेही वाचा – Mumbai-Pune Express वेवर बर्निंग बसचा थरार; बस चालकाच्या प्रसंगावधामुळे अनर्थ टळला! )
कोकण (Konkan Climate), मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या काही दिवसांत कमाल तापामानात बदल होणार नाही. तर किमान तापमान ३ ते ४ अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. तर त्यानंतर हळूहळू तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भात देखील पुढील दोन दिवस किमान व कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. त्यानंतर तापमान घट होण्याची शक्यता आहे. पुण्यात किमान तापमान १२ ते १८ अंश सेल्सिअसच्यादरम्यान नोंद करण्यात आली आहे. तर सांगली, सातारा आणि परभणी या भागातही किमान तापमान हे ११ ते १७ अंश सेल्सिअसच्यादरम्यान नोंदवण्यात आले आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community