अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहिजाद (Mohammad Shahizad ) (३३) ला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी आरोपीला 14 दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. मात्र, न्यायालयाने आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी (police custody) सुनावली आहे. (Saif Ali Khan)
वांद्रे कोर्टात रविवारी (19 जाने.) आरोपीला हजर करण्यात आलं, त्यानंतर न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितलं की, आरोपीचे नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहिजाद आहे. जो आतापर्यंत विजय दास या नावाने राहत होता. आरोपीकडे कोणतेही वैध भारतीय कागदपत्र नाही. (Saif Ali Khan)
हेही वाचा-“पहाटेच्या शपथविधीवेळी मी दादांना सावध केले होते, पण …” ; Dhananjay Munde यांच्या वक्तव्याने खळबळ
आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. ६ महिन्यांपूर्वी त्याने भारतात घुसखोरी करून राहत होता, मुंबईत तो हाऊसकिपीग चे काम करीत होता. पोलिसांना संशय आहे की आरोपी भारतीय नाही तर तो बांगलादेशातून बेकायदेशीरपणे आला आहे. (Saif Ali Khan)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community