रेल्वे, माहिती व प्रसारण, तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) हे जागतिक आर्थिक मंच (डब्ल्यूईएफ) 2025 साठी (WEF 2025 ) दावोसला जाणार आहेत. भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ठेवलेल्या, समावेशक विकास आणि परिवर्तनशील प्रगती, करण्यासंदर्भातील उद्दीष्टांची बांधिलकी याद्वारे अधोरेखित होईल. दावोसला रवाना होण्यापूर्वी वैष्णव यांनी भारताने सर्व समाजघटकांना, विशेषतः प्रगतीपासून वंचित राहिलेल्या घटकांना प्रगत करण्यात केलेल्या महत्त्वपूर्ण प्रयत्नांवर प्रकाश टाकला.
(हेही वाचा : मौनी अमावस्येला MahaKumbh मध्ये ८ ते १० कोटी भाविक येण्याची अपेक्षा)
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील तळागाळातील लोकांचे जीवन बदलण्यात सहाय्यभूत ठरणाऱ्या समावेशक विकासावर भर दिला आहे, बँक खाती उघडून आर्थिक समावेशकता साधणे, शौचालये, गॅस जोडणी, नळाद्वारे पाणी पुरवठा आणि ग्रामीण व शहरी भागातील पायाभूत सुविधा उभारणे, यासारख्या मूलभूत सेवांचा लाभ देणे, या संकल्पना जगाला समजून घ्यायच्या आहेत,” असे त्यांनी सांगितले. मंत्र्यांनी पुढे सांगितले की, जागतिक आर्थिक मंचात समावेशक विकास, सामाजिक, भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक तसेच तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण यावर या मंचावर सविस्तर चर्चा होईल. (Ashwini Vaishnav)
भारताचा डिजिटल क्रांतीचा ठसा
जागतिक आर्थिक मंच 2025 साठी दावोसला रवाना होण्यापूर्वी वैष्णव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली भारताने केलेल्या डिजिटल परिवर्तनाने जागतिक पातळीवर उत्सुकता निर्माण केली असल्याचे सांगितले. “भारताच्या आर्थिक धोरणांवर, डिजिटल इंडिया कार्यक्रमाने घडवलेल्या बदलांवर आणि तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना सक्षम करण्याच्या उपक्रमांवर जगाचे लक्ष केंद्रित आहे,” असे मंत्री म्हणाले. (Ashwini Vaishnav)
डिजिटल इंडिया (Digital India) उपक्रमांतर्गत विकसित केलेली भारताची नाविन्यपूर्ण डिजिटल संरचना समावेशक विकास साधण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येतो, याचे जागतिक प्रमाण ठरली आहे. जागतिक आर्थिक मंच 2025 मधील भारताचा सहभाग हा भागीदारी बळकट करणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि शाश्वत विकास व तांत्रिक नावीन्यतेत जागतिक नेतृत्व म्हणून भारताची प्रतिमा उंचावण्यावर भर देईल. (Ashwini Vaishnav)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community