Solar Power वर चालणारी देशातील पहिली कार लॉन्च

111
Solar Power वर चालणारी देशातील पहिली कार लॉन्च
Solar Power वर चालणारी देशातील पहिली कार लॉन्च

भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ (Bharat Mobility Global Expo 2025) कार्यक्रमात, पुणे येथील इलेक्ट्रिक वाहन स्टार्ट-अप कंपनी वायवे मोबिलिटीने देशातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी कार ‘Vayve Eva’ लाँच केली आहे. ही कार ३ मीटर लहान असून तिची सुरुवातीची किंमत ३.२५ लाख रुपये आहे. ही कार एकदा चार्ज केल्यावर २५० किमी पर्यंतची रेंज देईल. (Solar Power)

( हेही वाचा : मौनी अमावस्येला MahaKumbh मध्ये ८ ते १० कोटी भाविक येण्याची अपेक्षा

Vayve Eva कारमध्ये सोलर पॅनल देण्यात आले आहे. ज्याचा वापर कारच्या सनरूफच्या जागी केला जाऊ शकतो. या कारच्या १ किलोमीटर चालवण्याची किंमत फक्त ८० पैसे आहे. यासोबतच ही देशातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.त्याचबरोबर कंपनीचा दावा आहे की, ही कार एका चार्जवर २५० किमीपर्यंत धावू शकते. Vayve Eva तीन व्हेरिएंटमध्ये Nova, Stella आणि Vega मध्ये लाँच करण्यात आली आहे.ही कार ३ मीटर लहान आहे. यातील पहिल्या व्हेरियंटची किंमत ३.२५ लाख रुपये, Stellaची किंमत ३.९९ लाख रुपये आणि Vega व्हेरिएंटची किंमत ४.४९ लाख रुपये आहे. (Solar Power)

या कारमध्ये अ‍ॅपल-अँड्रॉइड सिस्टम उपलब्ध असेल. यामध्ये एसीसह अ‍ॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी सिस्टम आहे. त्याची लांबी ३०६० मिमी, रुंदी ११५० मिमी, उंची १५९० मिमी आणि ग्राउंड क्लीयरन्स १७० मिमी आहे. या कारच्या पुढच्या बाजूला स्वतंत्र कॉइल स्प्रिंग सस्पेंशन आणि मागील बाजूला ड्युअल शॉक सस्पेंशन आहे. यात पुढच्या चाकांमध्ये डिस्क ब्रेक आणि मागच्या चाकांमध्ये ड्रम ब्रेक आहेत. इलेक्ट्रिक पॉवर स्टेअरिंगने सुसज्ज असलेल्या या कारचा टर्निंग रेडियस ३.९ मीटर आहे. या रियर व्हील ड्राइव्ह कारचा टॉप स्पीड ७० किमी/तास आहे.ही सोलार कार फक्त ५ सेकंदात ० ते ४० किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठू शकते. त्याच वेळी, ही पूर्ण चार्ज होण्यासाठी फक्त ४५ मिनिटे लागतील. त्यामुळे आता या कारला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळणार का याकडे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. (Solar Power)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.