Republic Day 2025 : जिल्हानिहाय ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर

61
Republic Day 2025 : जिल्हानिहाय ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर
Republic Day 2025 : जिल्हानिहाय ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर

अनेक दिवस रखडलेली पालकमंत्र्यांची यादी शनिवारी १८/०१/२०२५ रोजी जाहीर करण्यात आली आहे. आता प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day 2025) २६ जानेवारी रोजी कोणते पालकमंत्री कोणत्या जिल्हयात ध्वजारोहण करणार याची यादी देखील राज्य सरकारने जाहीर केली आहे. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे.

मुंबई येथील मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क दादर मुंबई येथे ध्वजारोहण व समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम होईल. विभागीय आणि जिल्हा स्तरावर पुढे दर्शविल्याप्रमाणे मंत्री अथवा राज्यमंत्री ध्वजारोहण करतील. (Republic Day 2025)

(हेही वाचा – केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव WEF 2025 मध्ये होणार सहभागी)

ठाणे – उपमुख्यमंत्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, पुणे – उपमुख्यमंत्री अजित आशाताई अनंतराव पवार, नागपूर – मंत्री चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे, अहिल्यानगर – राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील, वाशिम – हसन सकीना मियालाल मुश्रीफ, सांगली – चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील, नाशिक- गिरीश गीता दत्तात्रय महाजन, पालघर- गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक, जळगाव- गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील, यवतमाळ- संजय प्रमिला दुलीचंद राठोड, मुंबई शहर- मंगलप्रभात प्रेमकंवर गुमनमल लोढा, मुंबई उपनगर- आशिष मीनल बाबाजी शेलार, रत्नागिरी- उदय स्वरूपा रवींद्र सामंत, धुळे- जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल, जालना- पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे, नांदेड- अतुल लीलावती मोरेश्वर सावे, चंद्रपूर- अशोक जनाबाई रामाजी उईके, सातारा- शंभुराज विजया देवी शिवाजीराव देसाई, बीड- दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे, रायगड- आदिती वरदा सुनील तटकरे, लातूर- शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले, नंदुरबार- ॲङ माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे, सोलापूर- जयकुमार कमल भगवानराव गोरे, हिंगोली- नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ, भंडारा- संजय सुशीला वामन सावकारे, छत्रपती संभाजीनगर संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट, धाराशिव- प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक, बुलढाणा- मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील), सिंधुदुर्ग- नितेश नीलम नारायण राणे, अकोला- आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर, गोंदिया- बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील, कोल्हापूर- प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकर, गडचिरोली- आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल, वर्धा- पंकज कांचन राजेश भोयर, परभणी- मेघना दीपक साकोरे – बोर्डीकर आणि अमरावती- इंद्रनील अनिता मनोहर नाईक.

राज्यात वरील दिवशी सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतींवर, किल्ल्यांवर तसेच जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत, असेही कळविण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.