Raigad Guardian Minister : पालकमंत्रीपदावरून नाराजीनाट्य; नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती

66
Raigad Guardian Minister : पालकमंत्रीपदावरून नाराजीनाट्य; नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती
Raigad Guardian Minister : पालकमंत्रीपदावरून नाराजीनाट्य; नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती

महायुतीच्या सरकारमधील पालकमंत्री पदाचे वाटप अखेर घोषित करण्यात आले. त्यावरून मंत्र्यांमध्ये नाराजी उफाळून आली आहे. भरतशेठ गोगावले (Bharat Gogawale) यांचा रायगडच्या पालकमंत्रीपदावर जोरदार दावा होता. त्यांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांना रायगडचे पालकमंत्रीपद दिल्याने रायगडमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. रायगडचे पालकमंत्रीपद हुकल्यानंतर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिका-यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामूहिक राजीनामे दिले. रायगडचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला दिल्याने निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर १९ जानेवारीला रात्री उशिरा नाशिक (Nashik) आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. (Raigad Guardian Minister)

(हेही वाचा – भारताचे जेम्स बॉन्ड Ajit Doval यांच्या आजवरच्या गुप्तचर कारवाया कोणत्या? जाणून घ्या..)

संदर्भाधीन शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र राज्याचे मा. मंत्री आणि मा. राज्यमंत्री यांची राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री/सह-पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उक्त शासन निर्णयाद्वारे करण्यात आलेल्या “नाशिक” आणि “रायगड” या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस पुढील आदेशापर्यंत, याद्वारे, स्थगिती देण्यात येत आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०११९२०५३२५५७०७ असा आहे, असे या आदेशात म्हटले आहे.

नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेंच, तर रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत पालकमंत्री पदावरून वाद सुरु आहे. भाजपाचे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना नाशिकचे पालकमंत्री करण्यात आले होते. यामुळे शिवसेनेचे दादा भुसे (Dadaji Bhuse) नाराज झाले. रायगडमध्ये अदिती तटकरे यांना पालकमंत्री दिल्याने भरत गोगवले नाराज झाले. (Raigad Guardian Minister)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.