Donald Trump : अमेरिकेत ट्रम्प पर्वाचा प्रारंभ; आज घेणार शपथ

68
Donald Trump : अमेरिकेत ट्रम्प पर्वाचा प्रारंभ; आज घेणार शपथ
Donald Trump : अमेरिकेत ट्रम्प पर्वाचा प्रारंभ; आज घेणार शपथ

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सोमवारी (20 जाने.) एका शानदार सोहळ्यात शपथ घेणार आहेत. अमेरिकेत (America) पुन्हा ट्रम्प पर्वाचा प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी, या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला ते वॉशिंग्टनमधील अनेक कार्यक्रमात रविवारी व्यस्त होते. ट्रम्प हे सत्तेत परतण्याचा आणि त्यांच्या ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (Make America Great Again) चळवळीचा उत्सव साजरा करत आहेत. व्हाईट हाऊसमध्ये परतण्याची त्यांची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. (Donald Trump)

हेही वाचा-BMC : फेरीवाल्यांच्या कारवाईवर गगराणींना ठेवावी लागणार निगराणी

अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सोमवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी १२ वाजता आणि भारतीय वेळेनुसार सोमवारी रात्री १०.३० वाजता अध्यक्षपदाची शपधविधी होणार आहे. या समारंभासाठी त्यांचे रविवारी वॉशिंग्टन येथे आगमन झाले.ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या अध्यक्षपदाची कारकीर्द सुरू करण्यापूर्वी कुटुंबीय, समर्थक आणि राजकीय मित्रांसह सोहळा साजरा केला. (Donald Trump)

हेही वाचा-भारताचे जेम्स बॉन्ड Ajit Doval यांच्या आजवरच्या गुप्तचर कारवाया कोणत्या? जाणून घ्या..

चार वर्षांपूर्वी जो बायडेन यांच्याकडे सत्ता सोपवून ते बाहेर पडले होते. ‘कॅपिटॉल हिल’ येथे त्यांच्या समर्थकांनी केलेल्या हल्ल्याने ती निवडणूक झाकोळली गेली होती. वॉशिंग्टनपासून जवळ असलेल्या व्हर्जिनिया येथे ‘ट्रम्प नॅशनल गोल्फ क्लब’ येथे ट्रम्प यांच्या स्वागतानिमित्त आतषबाजी करण्यात आली. वॉशिंग्टनमधील तापमान कमालीचे थंड असल्याने उद्घाटनाचा संपूर्ण सोहळा सभागृहात होण्याची शक्यता आहे. (Donald Trump)

हेही वाचा-World Economic Forum : उद्योग आणावेच लागतील देवाभाऊ !

ट्रम्प यांच्या आगमनाप्रीत्यर्थ आतषबाजी केली जात असताना त्यांच्या यांच्या नियोजित धोरणांना विरोध करण्यासाठी राजधानीत हजारो नागरिकांनी शनिवारी निदर्शने केली. ट्रम्प मंगळवारपासून अध्यक्षपदाचा कारभार सुरू करतील. त्यांना विरोध करण्यासाठी बिगरसरकारी संस्था सखी, ‘साउथ एशियन सर्व्हाव्हर्स’ यांनी ‘पीपल्स मार्च’अंतर्गत ट्रम्पविरोधात निदर्शने केली. (Donald Trump)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.