राज्यात गेल्या १९ दिवसांत आठ वाघांचा मृत्यू (Tiger Death) झाला आहे. हे सर्वच मृत्यू संशयास्पद आहेत, पण कोणत्याही अधिकाऱ्याला त्यासाठी जबाबदार धरण्यात आले नाही. त्यामुळे वन खाते (MAHARASHTRA FOREST DEPARTMENT) खरोखरच वाघांच्या संरक्षण व संवर्धनाविषयी गंभीर आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Tiger Death)
हेही वाचा-Mahakumbh 2025 : उत्तरप्रदेशचे मंत्रीमंडळ २२ जानेवारीला करणार संगमस्नान
दरम्यान, बल्लारशा-गोंदिया रेल्वेमार्गावर (Ballarat-Gondiya railway line) रविवारी (19 जाने.) सकाळी रक्सौल एक्स्प्रेसने (Raxaul Express) सिंदेवाही-आलेवाहीजवळ धडक दिल्याने वाघाचा जागीच मृत्यू झाला. चंद्रपूर-बल्लारपूर रेल्वेमार्गावर आजवर ५० पेक्षा अधिक वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत झालेले वाघांचे मृत्यू भविष्यात वाघांना असणारा धोका दर्शवणारे आहे. (Tiger Death)
वाघांचे तीन तुकडे करून जंगलात फेकल्यानंतरही वनाधिकाऱ्यांना माहिती होत नाही. वाघाची शिकार करून १२ नखे आणि दात काढून नेतात, पण त्याची साधी कुणकुणही त्यांना लागत नाही. वाघिणीचे बछडे उपासमारीने मरतात, त्यांची आई अजून सापडलेली नाही. वाघ नाल्याजवळ मृतावस्थेत पडलेला असूनही ते माहिती होत नाही. यातील दोन घटना स्पष्टपणे शिकारीकडे बोट दाखवणाऱ्या आहेत. या शिकारी स्थानिकांना हाताशी घेऊन बहेलिया शिकारी टोळ्यांनी घडवून आणल्या असतील तर संपूर्ण राज्यासाठी ती धोक्याची घंटा आहे. (Tiger Death)
वाघांचे मृत्यू (Tiger Death)
१) २ जानेवारी २०२५ – ब्रह्मपुरी वन विभागात सिंदेवाहीजवळील लाडबोरी शिवारात नाल्याजवळ वाघाचा मृतदेह आढळला.
२) ६ जानेवारी २०२५ – भंडारा जिल्ह्यातील तुमसर वनपरिक्षेत्रात पाचरा येथे वाघाचे तीन तुकडे करून फेकण्यात आले.
३) ७ जानेवारी २०२५ – यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन विभागाअंतर्गत उकणी कोळसा खाण परिसरात वाघाचा अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला.
४) ८ जानेवारी २०२५ – नागपूर जिल्ह्यातील देवलापार वनपरिक्षेत्रात वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळला.
५) ९ जानेवारी २०२५ – ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातील मूल बफर क्षेत्रात वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळला.
६) १४ जानेवारी २०२५ – गोंदिया वनपरिक्षेत्रामधील कोहका-भानपूर परिसरात वाघाचा मृतदेह आढळला.
७) १५ जानेवारी २०२५ – नागपूर जिल्ह्यातील देवलापार वनपरिक्षेत्रात नवेगाव नियतक्षेत्रातील कक्ष क्र. ४८७ मध्ये वाघाच्या बछड्याचा कुजलेला मृतदेह आढळला.
८) १९ जानेवारी २०२५ – बल्लारशा – गोंदिया रेल्वेमार्गावर सिंदेवाही-आलेवाहीजवळ रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाला.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community