सरकारकडून ST Mahamandal ला सवलतमूल्याचा अपूर्ण भरणा; कर्मचाऱ्यांचे महामंडळाकडे ३ हजार कोटी थकीत

42
सरकारकडून ST Mahamandal ला सवलतमूल्याचा अपूर्ण भरणा; कर्मचाऱ्यांचे महामंडळाकडे ३ हजार कोटी थकीत
सरकारकडून ST Mahamandal ला सवलतमूल्याचा अपूर्ण भरणा; कर्मचाऱ्यांचे महामंडळाकडे ३ हजार कोटी थकीत

सरकारकडून एसटी महामंडळाला (ST Mahamandal) दरमहा सवलत मूल्य पूर्ण चुकते केले जात नाही. सरकारने महामंडळाला ३६० कोटी रुपये देणे आहे. असे असूनही सरकार केवळ ३०० कोटी रुपये दिले जात आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाला (MSRTC) आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

(हेही वाचा – Tiger Death : राज्यात गेल्या १९ दिवसांत आठ वाघांचा मृत्यू; धक्कादायक माहिती आली समोर)

एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वेतनासाठी दरमहा ४०० कोटी रुपये लागतात. सरकारचे ३०० कोटी आणि उत्पन्नातील १०० कोटी मिळून पगार केला जातो. सध्या मिळालेल्या रकमेतून कर्मचाऱ्यांचा पगार तेवढा केला जातो. आर्थिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेल्या रकमेचा भरणा त्यांचे कर्ज, पीएफ, उपदान, विमा आदी खात्यात भरले जात नाही. या सर्व व्यवहारांचे मिळून कर्मचाऱ्यांचे एसटीकडे तीन हजार कोटी रुपये थकीत झाले आहे.

कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह भत्ता (Provident Allowance) आणि उपदानाचे दोन स्वतंत्र ट्रस्ट आहेत. ८९ हजार कर्मचाऱ्यांच्या पीएफचे (भविष्य निर्वाह निधी) ११०० कोटी आणि उपदानाचे १००० कोटी मिळून २१०० कोटी मागील दहा महिन्यांपासून ट्रस्टकडे भरणा करण्यात आलेले नाहीत. शिवाय वैद्यकीय देयकेही कर्मचाऱ्यांना दिलेली नाहीत.

पीएफ ॲडव्हान्ससाठीही वाट पहावी लागणार

अडचणीच्या वेळी कर्मचारी पीएफ ट्रस्टमधून रक्कम उचलतात. परंतु, ऑक्टोबर २०२४ पासून एकाही कर्मचाऱ्याला पीएफ ॲडव्हान्स रक्कम मिळालेली नाही. ट्रस्टमध्ये पुरेसा निधी नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना या रकमेकरिता प्रतीक्षा करावी लागत आहे.

ही स्थिती अशीच राहिली, तर जुलैनंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीएफची रक्कम मिळण्यातही अडचण येऊ शकते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (ST Mahamandal) यवतमाळ विभागात वैद्यकीय बिलाचे एक कोटी २७ लाख रुपये थकीत आहे. फेब्रुवारी २०२३ पासून कर्मचाऱ्यांना ही रक्कम वितरीत करण्यात आलेली नाहीत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.