Jasprit Bumrah : फेब्रुवारीत कळणार जसप्रीत बुमराह खेळण्यासाठी किती तंदुरुस्त?

Jasprit Bumrah : सध्या बुमराचा भारताच्या एकदिवसीय संघात समावेश झाला आहे

37
Jasprit Bumrah : फेब्रुवारीत कळणार जसप्रीत बुमराह खेळण्यासाठी किती तंदुरुस्त?
Jasprit Bumrah : फेब्रुवारीत कळणार जसप्रीत बुमराह खेळण्यासाठी किती तंदुरुस्त?
  • ऋजुता लुकतुके

इंग्लंड विरुद्धची एकदिवसीय मालिका आणि चॅम्पियन्स करंडकासाठी भारतीय संघाची निवड शनिवारी जाहीर झाली तेव्हा जसप्रीत बुमराचा समावेश त्या संघात होता. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी स्पष्ट केलं की, ‘बुमराहच्या स्नायूला कुठलीही गंभीर दुखापत नाही. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध पूर्ण मालिका तो खेळू शकला नाही. तरी चॅम्पियन्स करंडकापर्यंत तो तंदुरुस्त होण्याची आशा आहे. आणि तोपर्यंत तात्पुरता बदली खेळाडू म्हणून हर्षित राणाला संघात स्थान देण्यात आलं आहे.’ बुमराह मालिकेतील किमान पहिले दोन सामने खेळणार नाही, असं आगरकर यांच्या बोलण्यात आलं. (Jasprit Bumrah)

(हेही वाचा- सरकारकडून ST Mahamandal ला सवलतमूल्याचा अपूर्ण भरणा; कर्मचाऱ्यांचे महामंडळाकडे ३ हजार कोटी थकीत)

पण, या संघ निवडीनंतरही जसप्रीत बुमराहला नेमकं काय झालंय आणि तो कधी पूर्ववत होणार हे दोन प्रश्न अनुत्तरितच राहिले होते. आता विश्वसनीय सूत्रांकडून असं समजतंय की, २ फेब्रुवारीला बुमराच्या पाठीचे स्कॅन पुन्हा एकदा घेतले जाणार आहेत. आणि त्यानंतरच बुमराहचा संघातील समावेश नक्की होऊ शकेल. तोपर्यंत बीसीसीआय आणि खुद्द बुमराहनेही आपल्या तंदुरुस्तीविषयी मौन बाळगलं आहे.  (Jasprit Bumrah)

अलीकडेच बुमराने अफवांवर विश्वास ठेवू नका, असं ट्विट करत आपल्या दुखापतीविषयी एका बातमीचं खंडन केलं होतं. बुमराहच्या उपस्थितीविषयी साशंकता असली तरी मोहम्मद शमीने संघात पुनरागमन केलं आहे. आणि तो इंग्लंडविरुद्ध मालिकेतही खेळणार आहे. शस्त्रक्रियेनंतर शमी २ एकदिवसीय सामने आणि ७ टी-२० सामने खेळला आहे. आणि यात त्याने चेंडू तसंच बॅटनेही चमक दाखवली आहे.  (Jasprit Bumrah)

(हेही वाचा- Tiger Death : राज्यात गेल्या १९ दिवसांत आठ वाघांचा मृत्यू; धक्कादायक माहिती आली समोर)

शमी संघात परतला असला तरी मोहम्मद सिराजला एकदिवसीय संघातून वगळण्यात आलं आहे. आणि निवड समितीने १५ जणांच्या संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, अर्शदीप सिंग आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या या चौघा तेज गोलंदाजांची निवड केली आहे. तुलनेनं संघात जडेजा, कुलदीप, सुंदर आणि अक्षर असे चार फिरकीपटू आहेत. (Jasprit Bumrah)

चॅम्पियन्स करंडक स्पर्धा १९ फेब्रुवारीला सुरू होणार आहे. आणि भारतीय संघ २० तारखेला आपला पहिला सामना बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी १३ तारखेपर्यंत दुखापत किंवा इतर अपरिहार्य कारणांमुळे संघात बदल करण्याची मुभा क्रिकेट मंडळांना आहे. बुमराच्या दुखापतीचं सावट लक्षात घेऊनच बदली खेळाडू म्हणून निवड समितीने हर्षित राणाचा पर्याय ठेवला आहे. (Jasprit Bumrah)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.