BCCI Code of Conduct : बीसीसीआयची दशसूत्री खेळाडूंना अमान्य? रोहितने दिले तसे संकेत

BCCI Code of Conduct : दशसूत्री सारखं काहीही अधिकृत नाही, असं रोहीतने अलीकडे पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं

52
BCCI Code of Conduct : बीसीसीआयची दशसूत्री खेळाडूंना अमान्य? रोहितने दिले तसे संकेत
BCCI Code of Conduct : बीसीसीआयची दशसूत्री खेळाडूंना अमान्य? रोहितने दिले तसे संकेत
  • ऋजुता लुकतुके

ऑस्ट्रेलियातील खराब कामगिरीचं अवलोकन करण्यासाठी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर बीसीसीआयने खेळाडूंसाठी एक दहा कलमी आचार संहिता आणल्याची बातमी होती. यात देशांतर्गत सामने खेळण्याच्या सक्तीपासून ते परदेश दौऱ्यावर काय सुविधा मिळतील याविषयी कलमं आहेत. पण, खेळाडूंना ही दशसूत्री फारशी रुचलेली दिसत नाही. शनिवारी चॅम्पियन्स करंडासाठी संघ निवडीची पत्रकार परिषद झाली यात रोहित शर्माचा सूर काहीसा नकारात्मकच होता. (BCCI Code of Conduct)

(हेही वाचा- Stars in Ranji Trophy : बीसीसीआयच्या दणक्यानंतर रोहित, रिषभ सह हे स्टार खेळाडू खेळणार रणजी सामना )

इतकंच नाही तर बीसीसीआयचे नवीन सचिव देवजीत साकिया यांच्याशी तो याविषयी चर्चाही करणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या दशसूत्रींवर चर्चा झाली ती आढावा बैठकीतच, म्हणजे गौतम गंभीर, रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांच्या उपस्थितीत. पण, पत्रकारांशी बोलताना रोहित म्हणाला, ‘तुमच्याकडे बीसीसीआयने अधिकृतपणे काही कळवलं आहे का? नसेल तर त्यावर आज चर्चा करता येणार नाही. असं काही ठरलेलं नाहीए.’ इतकंच नाही तर पत्रकार परिषदेसाठी अजित आगरकर आणि रोहित शर्मा बसले तेव्हाही रोहीत अजित आगरकरांच्या कानात काहीतरी कुजबुजला. पण, माईक सुरू असल्यामुळे ते कॅमेरात टिपलं गेलं. (BCCI Code of Conduct)

‘ही पत्रकार परिषद संपली की मला सचिवांबरोबर बसावं लागेल. त्यांच्याशी कुटुंबीयांच्या कलमाविषयी मला बोलावं लागेल. कारण, सगळे (खेळाडू) मला फोन करत आहेत,’ असं रोहित आगरकरांशी बोलताना म्हणाला. हे तो अधिकृतपणे बोलला नसला तरी त्यातून खेळाडूंची नाराजीच दिसत होती. (BCCI Code of Conduct)

(हेही वाचा- Jasprit Bumrah : फेब्रुवारीत कळणार जसप्रीत बुमराह खेळण्यासाठी किती तंदुरुस्त?)

पत्रकारांना तर रोहित असे काही नियमच नाहीएत असं म्हणाला. तर निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी मात्र आचार संहिता असल्याचं मान्य केलं. थोडक्यात, खेळाडूंचा काही कलमांना आक्षेप आहे. यात कुटुंबीयांना सलग १४ चौदा दिवसांच्या वर दौऱ्यावर राहता येणार नाही, या कलमाला खेळाडूंचा जास्त विरोध दिसतो आहे. शिवाय खाजगी ट्रेनर किंवा मॅनेजर यांनाही परवानगी नाकारल्यामुळे काहीजण नाराज आहेत. सध्या खेळाडू आणि बीसीसीआयनेही आगामी चॅम्पियन्स करंडकावर लक्ष केंद्रीत केलं आहे. पण, त्यानंतर आचारसंहितेच्या मुद्याला वाचा फुटू शकते. (BCCI Code of Conduct)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.