Sachin @ColdPlay Concert : मुंबईतील कोल्डप्ले कन्सर्टमध्ये सचिन, सचिनचा नारा 

Sachin @ColdPlay Concert : सचिन तेंडुलकरने सहकुटुंब कोल्डप्ले कन्सर्टला हजेरी लावली 

61
Sachin @ColdPlay Concert : मुंबईतील कोल्डप्ले कन्सर्टमध्ये सचिन, सचिनचा नारा 
Sachin @ColdPlay Concert : मुंबईतील कोल्डप्ले कन्सर्टमध्ये सचिन, सचिनचा नारा 
  • ऋजुता लुकतुके

मुंबईत क्रिकेटच्या मैदानावर ‘सचिन, सचिन’ हा नारा काही नवीन नाही. मैदानात कुणीही खेळत असला तरी प्रेक्षकांचा सचिन घोष सुरूच असतो. पण, यावेळी कोल्डप्ले ही बहुचर्चित कन्सर्ट सुरू असताना मुंबईत अचानक हा नारा सुरू झाला. सचिनने आपली पत्नी अंजली आणि मुलगी सारासह अचानक या कन्सर्टला हजेरी लावली. आणि तो पडद्यावर झळकताच लोकांनी कन्सर्टचं भान विसरून काही काळ आपला सचिन घोष केला. (Sachin @ColdPlay Concert)

(हेही वाचा- Maha Kumbh 2025: संगमात स्नान करणाऱ्या भाविकांचा ओघ वाढला; महाकुंभात स्नान करणाऱ्यांची संख्या ८.२६ कोटींपेक्षा जास्त)

सचिन बाल्कनीत बसला होता. त्यानेही मग उठून दोन्ही हात उंचावत लोकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. आणि त्यांना नमस्कार केला. त्यामुळे लोकांमध्ये आणखी उत्साह संचारला. आणि काही मिनिटं कोल्डप्ले कन्सर्ट बंद होऊन सगळ्यांचा नजरा सचिनकडेच खिळून राहिल्या. तर आणखी एका व्हीडिओमध्ये सचिन कन्सर्टमध्ये गढून गेलेला दिसतोय. आणि त्याच्या एका हातात कुठल्यातरी ड्रिकचा ग्लास आहे. (Sachin @ColdPlay Concert)

मूळातच कोल्डप्ले हा ब्रिटिश बँड आहे. त्यामुळे त्यांनाही सचिनची लोकप्रियता ठाऊक आहे. आणि भारतीयांचं क्रिकेटवरील प्रेमही ठाऊक आहे. त्यांनीही आपलं गाणं थांबवून सचिनचं स्वागतच केलं. शिवाय कोल्डप्लेचा मुख्य गायक ख्रिस मार्टिननेही भारतीयांना खुश करण्यासाठी आपल्या कन्सर्टमध्ये जसप्रीत बुमराहचा उल्लेख केला. ‘आपल्याला आता शो थांबवावा लागेल. कारण, बॅकस्टेजला बुमरा उभा आहे. तो मला नंतर गोलंदाजी करणार आहे,’ असं मार्टिन म्हणाला. अर्थात, तो मजा करत होता. आणि भारतीय प्रेक्षकांना खुश करण्याचा त्याचा प्रयत्न होता. (Sachin @ColdPlay Concert)

(हेही वाचा- BCCI Code of Conduct : बीसीसीआयची दशसूत्री खेळाडूंना अमान्य? रोहितने दिले तसे संकेत)

कोल्डप्ले बँड मुंबईत १९ आणि २१ तारखांना आणखी दोन कन्सर्ट करणार आहे. तर त्यानंतर २५ आणि २६ जानेवारीला त्यांच्या अहमदाबाद इथं दोन कन्सर्ट होणार आहेत. (Sachin @ColdPlay Concert)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.