गुजरातमधील (Gujarat) बेट द्वारका (Bet Dwarka) येथे कॉरिडॉर (Dwarka Corridor Project) बनवण्याचे काम चालू आहे. या अंतर्गत येथील अवैध बांधकामांवर प्रशासनाने कारवाई चालू केली आहे. येथील अनेक बेकायदा बांधकामे बुलडोझर लावून जमीनदोस्त करण्यात आली आहेत.
सलग ५ दिवस प्रशासनाने केलेल्या कारवाईत ५० निवासी आणि व्यावसायिक बांधकामे पाडली जात आहेत. या कारवाईत ५३ कोटींहून अधिक किमतीची सरकारी जमीन रिकामी करण्यात आली आहे. या वेळी ७ मशिदी आणि दर्गा जमिनदोस्त करण्यात आले आहेत.
(हेही वाचा – Maha Kumbh 2025: संगमात स्नान करणाऱ्या भाविकांचा ओघ वाढला; महाकुंभात स्नान करणाऱ्यांची संख्या ८.२६ कोटींपेक्षा जास्त)
बेट द्वारिका देश भर के करोड़ों लोगों की आस्था की भूमि है। कृष्ण भूमि में किसी भी अवैध अतिक्रमण को नहीं होने देंगे। हमारी आस्था और संस्कृति की रक्षा करना हमारी जिम्मेदारी है।
Bhupendra Bhai Patel government in Gujarat has shown zero tolerance for illegal encroachment. pic.twitter.com/gaa8ZBKMoL
— Harsh Sanghavi (@sanghaviharsh) January 11, 2025
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, या जागेवर बेकायदेशीरपणे कब्जा करून येथून तस्करी आणि गुन्हेगारी कारवाया केल्या जात होत्या. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून येथे सर्वात मोठी कारवाई केली जात आहे. बेट द्वारकाच्या बालपार परिसरात सुमारे ४५-५० बेकायदेशीर निवासी आणि व्यावसायिक बांधकामांवर कारवाई केली गेली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community