-
ऋजुता लुकतुके
नेदरलँड्समध्ये सुरू झालेल्या टाटा स्टील खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत नवीन जगज्जेता डी गुकेशने भारताच्याच अनिष गिरीचा पराभव करत स्पर्धेत विजयाने सुरुवात केली. खरंतर गुकेश मोठ्या प्रवासानंतर उशिरा नेदरलँड्सला पोहोचला होता. शनिवारपर्यंत भारतात त्याचे दोन मोठे सत्कार होते. भारतीय बुद्धिबळ असोसिएशनने त्याचा १ कोटी रुपये देऊन गौरव केला. आणि त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवारी त्याचा खेलरत्न पुरस्काराने सन्मान झाला. आणि त्यानंतर घाई गर्दीत प्रवास करून गुकेश लिक ऑन झीला पोहोचला. त्यामुळे त्याला थकवा जाणवत होता. पण, तरीही अनिशच्या चुकीचा फायदा उचलत त्याने हा सामना जिंकला. (D Gukesh)
(हेही वाचा- देशाला पहिले खोखो विश्वविजेतेपद जिंकून देणाऱ्या संघाचे DCM Ajit Pawar यांच्याकडून अभिनंदन)
अनिश स्पर्धेचा गतविजेता आहे. आणि तो नेदरलँड्समध्येच राहतो. त्यामुळे ताजातवाना असलेल्या अनिशने सुरुवातीला काळे मोहरे असतानाही डावावर वर्चस्व मिळवलं होतं. पण, पंधराव्या चालीवर त्याच्याकडून एक चूक झाली. आणि त्याने गुकेशच्या राणीसाठी पटाची आपली बाजू मोकळी करून दिली. तिथून पुढे मग बाजी पालटली. आणि अखेर डच नंबर वन खेळाडू अनिश गिरीने पराभव मान्य केला. पण, आपल्याकडून चूक झाल्याचं लक्षात आल्यावर गिरीकडून आलेली प्रतिक्रिया सध्या सगळीकडे व्हायरल होतेय. गिरीने खुर्चीतच मान वाकडी केली. आणि तो मागे झुकला. मग क्षणात सावरून त्याने पुढील चाल खेळली. (D Gukesh)
Despair for Giri as he knows he’s about to lose a game he was winning vs. Gukesh! #TataSteelChess pic.twitter.com/nnMdo4I69I
— chess24 (@chess24com) January 18, 2025
पण, एक संधी मिळताच गुकेशने मागे वळून पाहिलं नाही. आणि डावावर पकड मिळवली. आता पहिल्या फेरीनंतर गुकेशने स्पर्धेतही एका गुणासह आघाडी घेतली आहे. तर भारताचे इतर खेळाडू प्रग्यानंदा, हरिकृष्णा, अर्जुन एरिगसीही पुढे वाटचाल करत आहेत. हरिकृष्णा आणि अर्जुन एरिगसी यांच्यातील सामना हरिकृष्णाने जिंकला. भारताच्या नंबर वन खेळाडूला हरवताना हरिकृष्णाने आक्रमक खेळाचं प्रात्यक्षिकच दाखवून दिलं. तर प्रग्यानंदाने आपला पहिला डाव बरोबरीत सोडवला आहे. (D Gukesh)
(हेही वाचा- अध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वी Donald Trump यांचं तिसर्या महायुद्धाबद्दल मोठं विधान)
क्रमवारीत आता गुकेशनंतर हरिकृष्णा तिसरा आहे. तर प्रग्यानंद सहावा आणि पराभवामुळे अर्जुन एरिगसी तळाला आहे. (D Gukesh)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community