Guardian Minister : एकनाथ शिंदे यांचा फडणवीसांना फोन… पालकमंत्रिपदाच्या स्थगितीची इनसाईड स्टोरी

82
Guardian Minister : एकनाथ शिंदे यांचा फडणवीसांना फोन... पालकमंत्रिपदाच्या स्थगितीची इनसाईड स्टोरी
  • प्रतिनिधी

महाराष्ट्रात पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आणि तटकरे व महाजन यांच्या पालकमंत्रिपद नियुक्तीस स्थगिती देण्याची विनंती केली. (Guardian Minister)

पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाल्यानंतर भरत गोगावले आणि दादा भुसे समर्थकांमध्ये नाराजीचा सुर होता. रायगडमध्ये आदिती तटकरे यांना पालकमंत्रिपद देण्यात आल्याने गोगावले समर्थकांनी नाराजी व्यक्त करत मुंबई-गोवा महामार्ग दोन तास ठप्प केला. त्यांच्या मते, शिवसेनेला डावलून तटकरे यांना पालकमंत्रीपद देणे चुकीचे आहे. दुसरीकडे, नाशिकमध्ये भाजपाचे गिरीश महाजन यांना पालकमंत्री केल्याने दादा भुसे यांची नाराजी उघड झाली. भुसे समर्थकांनीही यावरून तीव्र विरोध व्यक्त केला. (Guardian Minister)

(हेही वाचा – अध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वी Donald Trump यांचं तिसर्‍या महायुद्धाबद्दल मोठं विधान)

एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांना फोन केला

या वादग्रस्त परिस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून महत्त्वपूर्ण चर्चा केली. शिंदे यांनी गोगावले आणि भुसे यांच्या समर्थकांचा रोष शांत करण्यासाठी पालकमंत्रिपदांच्या नियुक्तीस स्थगिती देण्याची विनंती केली. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना सांगितले की, पक्षातील नेत्यांची अशी नाराजी महायुतीच्या एकात्मतेसाठी घातक ठरू शकते. यानंतर, फडणवीस यांनी तटकरे आणि महाजन यांच्या नियुक्त्यांवर त्वरित स्थगिती दिली. (Guardian Minister)

नाशिकमध्ये शिवसेना आणि भाजपामध्ये पालकमंत्रिपदासाठी तणाव होता, तर रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत मतभेद उफाळले होते. महायुतीतील नेते ऐकण्यास तयार नसल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थगितीचा मार्ग अवलंबला. या प्रकरणाने महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा उघड झाले असून, पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून पक्षांमध्ये असलेल्या असंतोषाला वाचा फुटली आहे. हा वाद निवळण्यासाठी आणि महायुतीचे स्थैर्य टिकवण्यासाठी फडणवीस-शिंदे यांना समन्वय वाढवावा लागणार आहे. (Guardian Minister)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.