-
ऋजुता लुकतुके
वानखेडे स्टेडिअमवर भारतीय क्रिकेटच्या अनेक आठवणी आहेत. २०११ मध्ये भारताने याच मैदानावर एकदिवसीय विश्वचषक जिंकला. त्यानंतर गेल्यावर्षी भारताने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर याच मैदानावर खेळाडूंची विजयी मिरवणूक संपन्न झाली. आणि सचिन तेंडुलकर आपली २००वी आणि शेवटची कसोटी याच मैदानावर खेळला. भारतीय क्रिकेटमधील हे अविस्मरणीय क्षण आहेत. असं हे वानखेडे स्टेडिअम यावर्षी ५० वर्षं पूर्ण करत आहे. त्याचं औचित्य साधून मुंबई क्रिकेट असोसिएशनने मागचा आठवडावर इथं वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. त्याची सांगता रविवारी १९ जानेवारीला मुंबईच्या सर्व माजी कर्णधारांच्या आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सर्व माजी अध्यक्षांच्या उपस्थितीत झाली. (Wankhede Stadium 50th Anniversary)
(हेही वाचा- अध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वी Donald Trump यांचं तिसर्या महायुद्धाबद्दल मोठं विधान)
यात व्यासपीठावरून जोरदार षटकार लगावला तो हिटमॅन रोहित शर्माने. त्याने सर्व मुंबईकर कर्णधारांना आणि १४० कोटी भारतीयांना चॅम्पियन्स करंडक याच मैदानावर आणू असं आश्वासन दिलं. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच जल्लोष झाला. तर सचिन तेंडुलकरने रोहितला ‘ड्रेसिंग रुममधील बोलणं बाहेर येऊ देऊ नकोस,’ म्हणत कानपिचक्याही दिल्या. (Wankhede Stadium 50th Anniversary)
वानखेडे स्टेडियमच्या ५०व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशनने एक भव्य कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा, महान फलंदाज सचिन तेंडुलकर, माजी फलंदाज सुनील गावसकर, माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि महान फलंदाज अजिंक्य रहाणे यांसारखे स्टार खेळाडू त्यात सहभागी झाले होते. (Wankhede Stadium 50th Anniversary)
(हेही वाचा- Sachin @ColdPlay Concert : मुंबईतील कोल्डप्ले कन्सर्टमध्ये सचिन, सचिनचा नारा )
वानखेडे स्टेडियमच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यादरम्यान रोहित शर्मा म्हणाला की, टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर आम्हाला बार्बाडोसमधील एका हॉटेलमध्ये बंद करण्यात आले होते. पण आम्हाला चाहत्यांसोबत जल्लोष साजरा करायचा होता. लहानपणापासून येथे खेळण्याचे स्वप्न आम्ही मी पाहिले होते. भारताचा असो या आयपीएल येथे कोणताही सामना खेळताना चाहत्यांनी कायम प्रोत्साहित केले आहे. त्यामुळेच, येथे खेळण्याचा नेहमीच विशेष आनंद असतो. यासाठी येथे टी-२० विश्वचषक घेऊन येण्याची माझी इच्छा होती.’ (Wankhede Stadium 50th Anniversary)
CAPTAIN ROHIT SHARMA TALKING ABOUT CHAMPIONS TROPHY:
“We will try to do everything we can to bring the trophy back again at Wankhede”. [ANI] pic.twitter.com/u2EoYnnHVL
— Johns. (@CricCrazyJohns) January 19, 2025
पुढे रोहित शर्मा म्हणाला की, याआधी २००७ सालचा टी-२० विश्वचषक इथं आणण्याचा आनंद अनुभवलेला होतो. तेव्हा मी युवा खेळाडू होतो. पण, यावेळी मला स्वतःला येथे विश्वचषक आणायचा होता. आणि २००७ मध्ये जे घडले होते, पुन्हा एकदा तो अनुभवायचा होता. टी-२० विश्वचषक जिंकून दिल्लीहून इथं येईपर्यंत वानखेडे स्टेडियम खचाखच भरले होते. तो दिवस आणि चाहत्यांचा तो उत्साह कधीच विसरता येणार नाही. (Wankhede Stadium 50th Anniversary)
(हेही वाचा- Trident Hotel Woman Dead : मुंबईतील अलिशान हॅाटेलमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ)
रोहित म्हणाला की, भारतीय संघ लवकरच चॅम्पियन्स करंडक मोहिमेला सुरुवात करेल आणि मुंबईच्या या प्रतिष्ठित स्टेडियममध्ये आणखी एक करंडक आणण्याचा प्रयत्न करेल. मला खात्री आहे की जेव्हा आपण दुबईला पोहोचू तेव्हा १४० कोटी लोकांच्या शुभेच्छा आपल्या मागे असतील. आम्हाला हे माहित आहे. हा करंडक वानखेडेवर परत आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.” (Wankhede Stadium 50th Anniversary)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community