- ऋजुता लुकतुके
दोन वेळा ऑलिम्पिक पदकं जिंकणारा भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आपली मैत्रीण हिमानीशी नुकताच विवाहबद्ध झाला आहे. दोन दिवसांपूर्वी सोनिपत इथं घरगुती पारंपरिक सोहळ्यात दोघांनी लग्नगाठ बांधली. नीरजच्या एका नातेवाईकांनी पीटीआय वृत्तसंस्थेला लग्नाविषयी माहिती दिली. ‘हो. दोनच दिवसांपूर्वी हा घरगुती सोहळा पार पडला. नक्की कुठं झाला ते मी सांगू शकत नाही. पण, मुलगी सोनिपतची आहे आणि सध्या ती अमेरिकेत शिकत आहे. दोघं मधुचंद्रासाठी भारातबाहेर रवाना झाले आहेत,’ असं भीम चोप्रा यांनी म्हटलं आहे. (Neeraj Chopra Wedding)
तर त्यानंतर काही वेळातच नीरजनेही अधिकृत ट्विटर हँडलवर आपल्या लग्नाची बातमी दिली आहे. ‘आयुष्यातील नवीन अध्याय सुरू करत आहे,’ असं नीरजने यात म्हटलं आहे. (Neeraj Chopra Wedding)
(हेही वाचा – Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलिस जबाबदार; मुंबई उच्च न्यायालयाचा अहवाल सादर)
जीवन के नए अध्याय की शुरुआत अपने परिवार के साथ की। 🙏
Grateful for every blessing that brought us to this moment together. Bound by love, happily ever after.
नीरज ♥️ हिमानी pic.twitter.com/OU9RM5w2o8
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) January 19, 2025
गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या लग्नाची चर्चा होती. त्याच्या पत्नीचे नाव हिमानी असे आहे. नीरज चोप्राने एक्सवर पोस्ट करून दिलेल्या माहिती दिली. ही पोस्ट करताना त्याने मी माझ्या जीवनाचा नवा अध्याय माझ्या कुटुंबासोबत सुरू करत आहे. तसंच त्याने लाल रंगाचा हार्ट इमोजी टाकून नीरज आणि हिमानी असे नाव टाकले आहे. नीरजने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याची पत्नी हिमानी दिसत आहे. तसेच दुसऱ्या एका फोटोमध्ये त्याची आई त्यांना आशीर्वाद देताना दिसतेय. त्याने शेअर केलेल्या तिसऱ्या फोटोत तो लग्नविधी पार पाडताना दिसतोय. (Neeraj Chopra Wedding)
नीरज चोप्राच्या पत्नीचे नाव हिमानी असे आहे. ती सध्या अमेरिकेत शिक्षण घेत आहे. खूप जवळचे मित्रमंडळी तसेच जवळच्या नातेवाईकांत नीरज आणि हिमानी यांच्या विवाह पार पडला. नीरज चोप्राने जवळच्या नातेवाईकांमध्ये लग्न केलं असलं तरी तो रिसेप्शन पार्टी देणार आहे. तशी माहिती त्याच्या काकांनी दिली आहे. (Neeraj Chopra Wedding)
नीरज चोप्रा हा भारताचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट भालाफेकपटू आहे. २०२० च्या टोकयो ऑलिम्पिकमध्ये त्याने भारतासाठी ॲथलेटिक्स प्रकारातील पहिलं सुवर्ण जिंकलं होतं. तर चारच वर्षांनी पॅरिसमध्ये त्याने रौप्य पदकाची कमाई केली. याशिवाय डायमंड्स लीग या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसह विश्वअजिंक्यपद स्पर्धेतही त्याने सुवर्णविजेती कामगिरी केली आहे. (Neeraj Chopra Wedding)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community