राजकीय स्वार्थासाठी सुरू असलेली भोंदूगिरी थांबवा; Ashish Shelar यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

55
राजकीय स्वार्थासाठी सुरू असलेली भोंदूगिरी थांबवा; Ashish Shelar यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
  • प्रतिनिधी

बांगलादेशी घुसखोर वांद्रे पश्चिमपर्यंत पोहोचले आहेत आणि वांद्रे पूर्वेकडे पोहोचायला वेळ लागणार नाही, असे म्हणत राजकीय स्वार्थासाठी सुरू असलेल्या भोंदूगिरीवर जोरदार टीका करत माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला.

सोमवारी एक्स (माजी ट्विटर) या समाजमाध्यमावर आपल्या भूमिकेवर ठाम राहून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उबाठावर हल्लाबोल केला. अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचे समोर आल्यानंतर भाजपावर टीका करण्याचा प्रयत्न उबाठाकडून झाला होता.

(हेही वाचा – पालकमंत्री वाटपात BJP चा मास्टरस्ट्रोक; पश्चिम महाराष्ट्रातून राष्ट्रवादी हद्दपार, मित्रपक्षांना दिलासा)

या संदर्भात अॅड. शेलार (Ashish Shelar) म्हणाले, “महाराष्ट्रात पहा चमत्कार, भोंदू हिंदुत्ववाद्यांचे ऐका नवे फुत्कार. बांगलादेशी घुसखोर बांद्र्यापर्यंत आले, म्हणून ‘छोटे आणि मोठे’ ठाकरे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाने बोटं मोडत आहेत. वरून आम्ही हिंदुत्व सोडले नाही असे दाखवण्याचा प्रयत्न करताहेत. मात्र, मतलबी आणि स्वार्थी हिंदुत्ववाद्यांना विचारायचे आहे की घुसखोरी का होते आणि कुठून होते?”

शेलार (Ashish Shelar) यांनी स्पष्ट केले की, आसाम आणि त्रिपुरासारख्या भाजपाच्या सत्तेतील राज्यांमधून घुसखोरी होत नाही. पश्चिम बंगालमधून बांगलादेशीयांची घुसखोरी सुरू आहे, जिथे ममता बॅनर्जींची सत्ता आहे. ममता बॅनर्जी सीमा सुरक्षा दलाच्या तैनातीला विरोध करतात. त्यांनी विचारले, “उद्धव ठाकरे यांच्या प्रिय ममता दीदींना का विचारत नाहीत की बांगलादेशीयांना थांबवण्यासाठी त्यांनी काय केले आहे?”

(हेही वाचा – Gadchiroli Forest Reserve : गडचिरोली वन अभयारण्याला भेट देण्याचा सर्वोत्तम वेळ कोणता ? वाचा सविस्तर …)

आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उबाठाच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले की, फक्त सभांमध्ये रुद्राक्षाच्या माळा घालून फिरणे म्हणजे खरे हिंदुत्व नाही. त्यांनी उबाठाला बांगलादेशीय घुसखोरीसारख्या गंभीर विषयांवर ठोस भूमिका घेण्याचे आव्हान दिले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.