Australian Open 2025 : ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत जोकोविच आणि अल्काराझ उपउपांत्य फेरीतच आमनेसामने

Australian Open 2025 : जोकोविचचं सामन्यानंतर सर्बियन पत्रकारांशी मात्र भांडण झालं.

55
Australian Open 2025 : ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत जोकोविच आणि अल्काराझ उपउपांत्य फेरीतच आमनेसामने
  • ऋजुता लुकतुके

यंदाच्या ऑस्ट्रेलियन स्पर्धेची चुरस उपउपांत्य फेरीपासूनच शिगेला पोहोचली आहे. महिलांच्या लढती तर रंगतदार आहेतच. शिवाय आता पुरुषांमध्ये उपउपांत्य फेरीची लढत नोवाक जोकोविच आणि कार्लोस अल्काराझ यांच्यात रंगणार आहे. जोकोविचने रविवारी झेक रिपब्लिकच्या २४ व्या सिडेड जिरी लेहेकाचा ३ सरळ गेममध्ये पराभव केला. ३७ वर्षीय जोकोविचने यापूर्वी विक्रमी १० वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

मंगळवारी जोकोविच आपला सामना खेळायला कोर्टवर उतरेल तेव्हा ती त्याची १५ वी उपउपांत्य लढत असेल आणि तेव्हा तो रॉजर फेडररच्या विक्रमाशी बरोबरी करेल. तर नदाल आणि जॉन न्यूकोम्ब यांचा विक्रम त्याने मोडीत काढलेला असेल. नुसतं इतकंच नाही तर ग्रँडस्लॅम कारकीर्दीत ही त्याची ६१ वी उपउपान्त्य फेरीची लढत असेल. (Australian Open 2025)

(हेही वाचा – Emergency Movie Collection : ‘इमर्जन्सी’ने उडवली खळबळ ; तीन दिवसांत 10 कोटींचा टप्पा पार)

जोकोविचची लढत अल्काराझशी होणार आहे. तो ही नदाल प्रमाणे क्ले कोर्टचा बादशाह आहे. त्याला यंदा तिसरं सिडिंग मिळालं आहे. त्याच्या नावावर २१ व्या वर्षी ४ ग्रँडस्लॅम विजेतेपदं आहेत. पण, तो ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उपउपांत्य फेरीच्या वर पोहोचलेला नाही.

अल्काराझला आपल्या चौथ्या फेरीच्या लढतीत फारसा प्रतिकार झाला नाही. प्रतिस्पर्धी जॅक ड्रेपरने ५-७ आणि १-६ अशा पिछाडीनंतर दुखापतीमुळे सामना सोडला. जोकोविच आणि अल्काराझ यापूर्वी ७ वेळा आमने सामने आले आहेत आणि यात जोकोविच ४-३ असा आघाडीवर आहे. अलीकडे पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत जोकोविचने विजय मिळवला होता. जोकोविचच्या विजयानंतर रॉड लेव्हर अरेनावर एक नाट्य मात्र घडलं. विजयानंतरच्या औपचारिक मुलाखतीला जोकोविचने बगल दिली. चॅनल ९ चा अधिकृत सादरकर्ता टोनी जोन्सने सर्बियन चाहत्यांकडे बघून हावभाव केले आणि त्यांच्याशी बोलताना तो जोकोविच अवाजवी महत्त्व दिला जाणारा स्टार आहे, असं वक्तव्य त्याने केलं, असं जोकोविचचं म्हणणं आहे. (Australian Open 2025)

(हेही वाचा – Cricket in Olympics : ऑलिम्पिक समितीच्या बैठकीसाठी जय शाह लुसानमध्ये दाखल)

जोकोविचने तसं उघडपणे बोलून दाखवलं नाही. पण, त्याने प्रेक्षकांचे फक्त आभार मानले आणि जोन्सशी बोलायला नकार दिला. ‘स्पर्धेच्या अधिकृत प्रसारण हक्क असलेल्या वाहिनीच्या सादरकर्त्याने सर्बियन चाहत्यांचा अपमान केला आणि माझ्याबद्दलही त्याने अपमानजनक शेरेबाजी केली आहे,’ हे कारण मात्र त्याने मुलाखत टाळताना दिलं. आता जोकोविचचा पुढील सामना मंगळवारी होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.