संजय राऊत (Sanjay Raut) हे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धास्थानी असलेल्या महाकुंभमेळ्याची खिल्ली उडवली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांनी महाकुंभमेळा, शंकराचार्य, नागा साधू, संत-महंत तसेच हिंदू धर्मात सांगितलेल्या उपासना मार्गांचा अवमान केला आहे. संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे खुद्द उबाठा शिवसेनेतील बरेच नेतेमंडळी नाराज झाले आहेत. राऊतांच्या अशा वक्तव्यांमुळे ‘उबाठा पक्षाची हिंदू धर्मविरोधी आणि मुसलमानांचे लांगुलचालन करणारा पक्ष’, अशी प्रतिमा बनली आहे. यामुळे मुख्यतः उबाठा शिवसेनेतील नेतेमंडळी नाराज झाले आहेत.
जेव्हा उद्धव ठाकरे यांनी भाजपाची युती तोडून २०१९ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यानंतर दोन्ही काँग्रेसची मर्जी सांभाळताना आणि दोन्ही काँग्रेसचे मतदार असलेल्या मुसलमानांना खुश करताना उबाठा कायम हिंदू धर्मविरोधी भूमिका घेऊ लागला. त्यासाठी संजय राऊत (Sanjay Raut) हिंदू धर्मविरोधी वक्तव्य करून उबाठा कसा काँग्रेस पक्षाप्रमाणे निधर्मी, हिंदू धर्मविरोधी बनला आहे, हेच दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणूनच लोकसभा निवडणुकीत उबाठाला महाराष्ट्रात मुसलमानांनी भरभरून मते दिली. त्यामुळे मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांवर विश्वास बसलेल्या उबाठाने आता संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही मुसलमानांना चुचकारण्यासाठी पुन्हा हिंदू धर्मविरोधी वक्तव्य करणे सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आता सध्या सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यावरही टीका केली आहे.
उबाठाची काँग्रेस करण्याच्या संजय राऊतांच्या (Sanjay Raut) प्रयत्नांमुळे आता उबाठामध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे समजते. उबाठा शिवसेनेमधील काही नेते संजय राऊतांच्या या वक्त्यव्यामुळे तीव्र नाराज झाले आहेत. अशामुळे पक्ष हिंदूंच्या मतांपासून कायम दूर जाईल. त्याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला बसेल, अशी भीती या नेत्यांना वाटू लागली आहे. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना नागा साधू वर्षानुवर्षे करत असलेल्या तपस्येची खिल्ली उडवली आहे. नागा साधू यांचे हिंदू धर्मामध्ये अन्यन साधारण महत्व आहे.
काय आहे नागा साधूंचे महत्व?
नागा साधू हे जगतगुरू आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेले सैन्य आहेत. आखाड्यांच्या काळापासून शस्त्रे वापरण्यात नागा साधू तरबेज आहेत. प्राचीन काळी नागा साधू त्रिशूळ, भाला, तलवार, कुऱ्हाड आणि खुकरी वापरत असत. आदि गुरु शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या दशनामी संन्यासी परंपरेतील नागा संन्यासी आखाड्यांमध्ये शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे. गेल्या २,५०० वर्षांपासून दशनामी संन्यासी परंपरेतील नागा संन्यासी ही परंपरा पाळत आहेत. ते आखाड्यांमध्ये शस्त्रांची पूजा करतात. आदिगुरु शंकराचार्यांनी राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी शास्त्रे आणि शस्त्रांची परंपरा स्थापित केली होती. प्राचीन काळात अनेक आक्रमणकर्त्यांना भारतावर हल्ले. त्यांचा पसरवण्यासाठी जनतेवर अत्याचार केले. त्या आक्रमकांना रोखण्यासाठी नागा साधू पुढे आले. त्यांनी परकीयांविरोधात अनेक लढाया लढल्या आहेत. नागांनी त्यांच्या धर्माचे रक्षण करण्यासाठी आपले प्राणही अर्पण केले. यामुळे सामान्य लोकांमध्ये त्यांचे महत्त्व आणि आदर आणखी वाढला. त्यांना शूर पुरुष, धर्मरक्षक आणि धर्मवीर म्हणून ओळखले जाते.
अशा नागा साधूंना संजय राऊतांनी (Sanjay Raut) अघोरी विद्या करतात, नाचतात, ते अस्वस्थ आत्मा आहेत, असा अत्यंत संतापजनक उल्लेख करून राऊतांनी न केवळ नागा साधूंचा अवमान केला, तर शंकराचार्य आणि संपूर्ण हिंदू धर्माचा अवमान केला आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थ आत्मा आहे. त्याने खरं म्हणजे महाकुंभमेळ्यात जाऊन बसायला पाहिजे होतं नागा साधूंबरोबर. नागा साधूही अस्वस्थ असतो फार. अघोरी विद्या करतात, नाचतात आपल्या तंबूत बसतात. जे अस्वस्थ आहेत महाराष्ट्रात आहेत या क्षणी, त्यांच्यासाठी योगी आदित्यराज यांनी प्रयागराजमध्ये काही तंबू आणि साधूंची व्यवस्था केली आहे. अस्वस्थ आत्म्यांनी तिकडे जायचं. अस्वस्थ आहात तर महाराष्ट्राला का त्रास देता. तुमच्या अस्वस्थपणामुळे महाराष्ट्राला त्रास देऊ नका. तुमची ही राजकीय अस्वस्थता महाराष्ट्राच्या मुळावर, लोकांच्या मुळावर येतेय. जितके दिवस कुंभ आहे, तितके दिवस अस्वस्थ मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी कुंभमेळ्यात जाऊन शांतपणे ध्यानधारणा करावी.
Join Our WhatsApp Community