हिंदू धर्मावर होणारे मुस्लिम व ख्रिश्चनीकरणाचे आक्रमण थांबवा; Mahant Ramgiri Maharaj यांचे विधान

49
हिंदू धर्मावर होणारे मुस्लिम व ख्रिश्चनीकरणाचे आक्रमण थांबवा; Mahant Ramgiri Maharaj यांचे विधान
हिंदू धर्मावर होणारे मुस्लिम व ख्रिश्चनीकरणाचे आक्रमण थांबवा; Mahant Ramgiri Maharaj यांचे विधान

राज्यात सर्वात जास्त धर्मातरण आपल्या जिल्ह्यात होत आहे.आजपर्यंत आपल्या चुकीमुळे किंवा दुर्लक्षामुळे हे घडत आले.पण आता हिंदूंनी (Hindu) जागृत राहून जिल्ह्यात हिंदू (Hindu) धर्मावर होणारे मुस्लिम (Muslim) व ख्रिश्चनिकरणाचे आक्रमण थांबवले पाहिजे,असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज (Mahant Ramgiri Maharaj) यांचे नाथजागृती यात्रेच्या सांगते प्रसंगी मायंबा येथे केले.

( हेही वाचा : Neeraj Chopra Wedding : ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा हिमानीशी विवाहबद्ध, सोशल मीडियावरून दिली माहिती

धर्म जागरण ट्रस्ट आयोजित नाथ जागृत यात्रा आयोजित करण्यात आली. होती तिच्या सांगतेला ते बोलत होते.यावेळी मिलींद वाईकर (धर्मजागरण प्रांत सह संयोजक) श्रीक्षेत्र मायंबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, बाबासाहेब म्हस्के,श्री क्षेत्र गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जालिंदर कदम,श्रीक्षेत्र मढी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड (Sanjay Markad) आदीसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगर जिल्ह्यासह इतर भागात हिंदूच्या जागेवर वक्फ बोर्ड ताबा मारण्याचा प्रयत्न करत आहे. लव्ह जिहाद,धर्मांतरण,भूमी जिहाद रोखण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली होती.त्यामध्ये मोठ्या संख्नेने नाथभक्त सहभागी झाले होते.मांजरसुंभा येथील गोरक्ष नाथ देवस्थान ट्रस्ट (Goraksha Nath Devasthan Trust) , मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट,व मायबा येथील मच्छिन्द्रनाथ देवस्थान ट्रस्ट या तिन्ही संस्थांनी एकत्र येऊन यात्रा काढली होती.श्री गोरक्षनाथ गडावर रथपादुका पूजन व महाआरती नाथजागृती यात्रेस प्रारंभ झाला. (Hindu)

या संदर्भात यात्रेत एक पत्रक वाटण्यात आले. त्यामध्ये म्हटले आहे कि यतो धर्म: ततो जयः असे सांगणारी आपली महान हिंदू संस्कृती.या पावन भूमीवर नाथ संप्रदाय धर्मरक्षणाचे ब्रीद घेऊन उभा राहिला.आदिनाथांपासून सुरू झालेली ही नाथसंप्रदायाची परंपरा गर्भगिरीच्या डोंगरदऱ्यां मध्ये मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, कानिफनाथ यांच्यारूपाने विस्तार पावली.संपूर्ण भारतातही या परंपरेचा विस्तार झाला देव,देश आणि धर्मरक्षणाचे ब्रीद हाती घेऊन नाथ संप्रदायाचे अनुयायी सर्वत्र जागरण करू लागले.परकीय आक्रम णापासून सनातन धर्माच्या रक्षणाचे महत्कार्य करणारा नाथ संप्रदाय.आज मात्र धर्मांतराची आणि जमीन जिहादाची काळी छाया या महान परंपरेवर आणि नाथ मंदिरांवर पडू लागली आहे.नाथ संप्रदायाची अनेक पवित्र ठिकाणे पीर म्हणून काबीज करण्याचे प्रयत्न होत आहेत.विविध जिहादांच्या द्वारे धर्मांतर मोठ्या प्रमाणात घडवून आणण्याचे षडयंत्र अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरून होत आहे.(Hindu)

ख्रिस्ती धर्मांतरण अत्यंत वेगाने नगर जिल्ह्यात तसेच देशभरा त आपले जाळे पसरत आहे.वेळ आली आहे आता जागे होण्याची,मतभेद विसरून धर्म रक्षणासाठी सज्ज होण्याचीगरज आहे.जे लोक आपला धर्म सोडून गेले आहेत त्यांना परत आणून त्यांच्या घरात भगवंताला पुन्हा प्रतिष्ठापित करण्याचे पवित्र कार्य करायचे आहे.चला तर मग संतांच्या बरोबर हिंदू समाजाचे धर्म जागरण व धर्म रक्षण करूया कारण ही आता नाथ संप्रदायाच्याच नव्हे तर संपूर्ण हिंदू समाजाच्या अस्तित्वाची लढाई आहे.नाथांची महान परंपरा प्रत्येक नाथ भक्ताला कळकळून पुकारत आहे.आपल्या महान परंपरेवरचा हा प्रचंड मोठा आघात लक्षात घेऊन सर्व संत महंतांची शक्ती आता धर्म रक्षणासाठी सज्ज झाली आहे.संतमहंतांबरोबर धर्मक्षणाच्या पावन यात्रेसाठी नाथ जागृती यात्रेसाठी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. (Hindu)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.