Guardian Minister : गडचिरोली, कोल्हापूर, मुंबई उपनगर येथे सह पालकमंत्री पद निर्माण करण्यामागील काय आहे राजकारण?

राज्यात मुंबई उपनगर, कोल्हापूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी पालकमंत्री पदासोबत सह पालकमंत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

85

बहुचर्चित बहुप्रतिक्षेत पालकमंत्री (Guardian Minister) पदाची नियुक्ती केल्यानंतर महायुतीतील घटक पक्ष भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांतील काही मंत्र्यांमध्ये रुसवेफुगवे समोर आले आहेत. त्यातच काही जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन प्रथमच सह पालकमंत्री नियुक्त करण्यात आले आहेत का, अशी चर्चा सुरु झाली आहे. राज्यात मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी पालकमंत्री आशिष शेलार आणि सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री म्हणून माधुरी मिसाळ तर गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सह पालकमंत्री आशिष जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई उपनगरात भाजपाची आणखी ताकद वाढणार

मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेऊन भाजपाने मुंबई उपनगर येथे भाजपच्याच दोन मंत्र्यांना पालकमंत्री (Guardian Minister) आणि सह पालकमंत्री म्हणून नियुक्त केले आहे. याठिकाणी भाजपचे वर्चस्व आहेच, पण महापालिका निवडणुकीत बहुतांशी नगरसेवक निवडून यावेत, यासाठी जिल्ह्यावर मजबूत पकड असावी, म्हणून भाजपने इथे दोन मंत्र्यांना पालकमंत्री बनवले आहेत. कदाचित भाजप या जिह्याचे दोन विभाग करून पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर अशी विभागणी करून हे दोन विभाग या दोघांमध्ये विभागण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपाला अत्यंत खालपर्यंत यंत्रणा राबवणे शक्य होणार आहे.

(हेही वाचा Guardian Minister : पालकमंत्री पदावरून इतका रुसवाफुगवा का? काय अधिकार असतात पालकमंत्र्यांचे? जाणून घ्या…)

कोल्हापुरात शिवसेना शिंदे गटावर नियंत्रण 

कोल्हापूर जिल्ह्यात पालकमंत्री (Guardian Minister) म्हणून शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रकाश आबिटकर यांना नियुक्त केली आहे, तर सह पालकमंत्री म्हणून माधुरी मिसाळ यांची निवड करण्यात आली आहे. कोल्हापुरात जशी शिवसेनेची ताकद आहे, तशीच भाजपाची आहे. अशावेळी जिल्ह्याचे नियंत्रण सगळेच शिवसेनेकडे जाऊ नये म्हणून कदाचित इथे भाजपने मंत्री माधुरी मिसाळ यांना सह पालकमंत्री म्हणून नियुक्त केले आहे. त्यामुळे इथेही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला असावा.

गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांनी विदर्भातील मंत्र्याची निवड 

गडचिरोली हा भाग तसा नक्षलग्रस्त भाग आहे. इथे सुरक्षेचा विषय जसा संवेदनशील आहे, तसे विकासकामांच्या बाबतीतही याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पालकमंत्रीपद (Guardian Minister) स्वतःकडे घेतले आहे. पण येथील कामाचा आढावा घेण्यासाठी, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विदर्भातीलच स्थानिक मंत्री आशिष जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.