विधानसभेत हिरव्या सापांबरोबर मविआचा बंदोबस्त केला; आमदार Sangram Jagtap यांचा हल्लाबोल

78
विधानसभेत हिरव्या सापांबरोबर मविआचा बंदोबस्त केला; आमदार Sangram Jagtap यांचा हल्लाबोल
विधानसभेत हिरव्या सापांबरोबर मविआचा बंदोबस्त केला; आमदार Sangram Jagtap यांचा हल्लाबोल

पंचवटी नगर श्रीराम मंदिरात ७ दिवस सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथेचा हजारो नागरिकांनी आनंद घेतला असून बारस्कर कुटुंबीय धार्मिकतेचे कार्य पुढे घेऊन जाण्याचे काम करत आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एका समुदायाने वेगळी भूमिका घेतली असल्यामुळे उत्तर प्रदेश,महाराष्ट्र,राज्यस्थानमध्ये वेगळे निकाल लागले.याचे कारण म्हणजे आपण गाफील राहिलो. लोकसभेचा निकाल लागताच शहरातील कापड बाजारामध्ये हिरवा गुलाल उधळला.ही हिंमत कुठून आली.यासाठी आपला धर्म वाचवायचा असेल तर राजकारण बाजूला ठेवून हिंदू (Hindu) धर्मासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.गणपती विसर्जन मिरवणुकीत काही लोक केडगाव मधून आले आणि त्यांनी कवाली वाजवली. आता ही प्रथा सुरू होईल.कव्वाली आम्ही देखील वाजू मात्र त्या एका समुदायाने मोहरम मध्ये गणपतीचे गाणे वाजवले तर, आम्ही देखील कव्वाली वाजव.आपण कुठपर्यंत सहन करायचे हे असे चालू राहिले तर आपल्या डोक्यावर हिरव्या टोपे येतील.विधानसभा निवडणुकीमध्ये हिरव्या सापाबरोबर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) बंदोबस्त केला आहे, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले.

( हेही वाचा : राज्यात राजकीय भूकंप होण्याचे शिवसेना उपनेते Rahul Shewale यांचे संकेत

पाईपलाईन रोड पंचवटी नगर येथील श्रीराम मंदिर येथे बारस्कर कुटुंब यांच्या वतीने भागवत कथेच्या समारोप प्रसंगी भगवत गीतेचे भाविकांना वाटप करण्यात आले. अहिल्यानगर शहरांमध्ये विकासाचे काही काम मागे राहिले होते. आता आम्ही दोघे मिळून पूर्ण करू.आमदार संग्राम जगताप यांची वेगळी भूमिका पाहिला मिळाली. मात्र, मी पाच वर्षांपूर्वीच ही भूमिका घेतली होती.आता आम्ही दोघे मिळून हा विषय पुढे नेऊ भागवत कथेतून नागरिकांमध्ये धार्मिकतेची गोडी निर्माण होत असते. त्या माध्यमातून आनंदी जीवन जगण्याचा मार्ग मिळतो. (Sangram Jagtap)

बारस्कर कुटुंबाच्या वतीने आमच्या वजना एवढ्या भागवत गीतेचे वाटप केले.हा उपक्रम कौतुकास्पद आहे.हभप मंदारबुवा रामदासी महाराज यांच्या वाणीमुळे श्रोते मंत्रमुग्ध झाले.माजी नगरसेविका दिपाली बारस्कर कार्यक्षम नगरसेविका म्हणून ओळखल्या जात असल्याचे मत माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.पाईपलाईन रोड पंचवटी नगर येथे सात दिवस भागवत कथा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. कथेचा समारोप होत असून मनाला हुरहुर लागली आहे.पाईपलाईन उपनगर हे माझे माहेर घर आहे. परमेश्वर आपल्याकडून धार्मिकतेचे चांगले कार्य घडून घेत असतो. कथेच्या माध्यमातून माणसे जोडले जातात, त्या माध्यमातून एकमेकांमध्ये स्नेहबंध तयार होऊन आपुलकीची, प्रेमाची भावना निर्माण होत असते,असे मत माजी नगरसेविका दिपाली बारस्कर यांनी व्यक्त केले. (Sangram Jagtap)

भागवत कथेमध्ये आमच्या आई भिमाबाई बारस्कर (Bhimabai Barskar),आमदार संग्राम जगताप,माजी खासदार सुजय विखे पाटील यांची ग्रंथ तुला केले असून त्यांच्या वजना एवढे भागवत गीतेची वाटप नागरिकांना करण्यात आले. तसेच जीवनसार पुस्तकाचे लेखक बाळासाहेब जाधव यांना साहित्यरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. आणि हिराबाई बारस्कर- औटी यांना यशस्वी महिला उद्योजिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर यांनी दिली. (Sangram Jagtap)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.