Saif Ali Khan च्या अपार्टमेंटमध्ये हल्लेखोर कसा शिरला? स्वत:च केला खुलासा

108
Saif Ali Khan च्या अपार्टमेंटमध्ये हल्लेखोर कसा शिरला? स्वत: च केला खुलासा
  • प्रतिनिधी

अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) वास्तव्यास असलेल्या वांद्रे येथील सद्गुरू शरण या इमारतीत हल्लेखोराने प्रवेश कसा केला?, आणि तो सैफ अली खानच्या घरापर्यंत कसा पोहचला असा? असे प्रश्न सर्वांना पडले होते. याचा खुलासा झाला आहे, मुंबई पोलिसांनी अटक केलेला हल्लेखोर आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद उर्फ विजय दासने पोलिसांच्या चौकशीत गुन्हा कबूल करून त्याने इमारतीत प्रवेश करून सैफ अली खानच्या घरापर्यंत कसा पोहचला याबाबत खुलासा केला आहे.

(हेही वाचा – नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजारालाही हटवण्यासाठी संकल्प; Amitabh Bachchan यांनी केले आवाहन)

मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद उर्फ विजय दास (३०) असे सैफ अली खान वर हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव असून, हा हल्लेखोर बांगलादेशी नागरिक आहे. मोहम्मद शरीफुल इस्लामचे शिक्षण बारावी पर्यंत झालेले असून अ‍ॅथलेटिक्सचा चांगला खेळाडू आहे. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा नोकरीच्या शोधात ६ महिन्यांपूर्वी बांगलादेशातून मुंबईत आला होता. आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला पैशांची नितांत गरज असल्यामुळे त्याने चोरीचा मार्ग पत्करला होता. हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वी त्याने वांद्रे पश्चिम परिसरातील हायप्रोफाइल सोसायटीची रेकी केली होती. यादरम्यान त्याने बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान यांच्या मन्नत बंगल्याची देखील रेकी करून मन्नत बंगल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तेथील सुरक्षा व्यवस्था बघून त्याने शाहरुखच्या बंगल्यात प्रवेश करण्याचा निर्णय मागे घेतला. आरोपी मोहम्मद शरीफुल याने सैफ अली खान (Saif Ali Khan)  राहत असलेल्या सद्गुरू शरण या इमारती जवळ आला असता इमारतीतील सुरक्षा रक्षक झोपी असल्याचे बघून त्याने सदगुरु शरण या इमारतीत चोरी करण्याचा निर्णय घेतला. आरोपीने जवळच्या रस्त्यावरून इमारतीच्या कंपाऊंडच्या भिंतीवरून आत उडी मारली. कंपाऊंडमध्ये सुरक्षा रक्षक गाढ झोपला होता. त्यानंतर आरोपीने ड्रेनेजचा वापर करून इमारतीच्या भिंतीच्या काही भागावर चढला, त्यानंतर त्याने जिन्याचा वापर करून सैफच्या बाथरूममध्ये जाण्यासाठी डक्टिंगचा वापर करून बाथरूममधून तो सैफचा मुलगा जहांगीरच्या बेडरुममध्ये आला. त्यापूर्वी तो त्याने ११ व्या मजल्यावरील अभिनेत्याच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी त्याच इमारतीतील दुसऱ्या फ्लॅटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता.

(हेही वाचा – 26 January : नाशिकमध्ये महाजन, रायगडमध्ये तटकरेंच्या हस्ते ध्वजावतरण)

जहांगीरच्या बेडरूममध्ये आवाज झाल्यामुळे स्टाफ नर्सला जाग आली आणि तिने आरडाओरड करताच सैफ अली खान आणि दुसरी मोलकरीण त्या ठिकाणी आली. आरोपीने स्वतः जवळील चाकू काढून स्टाफ नर्सवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सैफने (Saif Ali Khan)  जेव्हा मध्यस्थी केली त्यावेळी घाबरलेल्या आरोपीने मागचा पुढचा विचार नाकारता त्याने सैफवर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यानंतर हल्लेखोराने पळून जाण्यासाठी आलेला मार्ग वापरून तो डक्टिंगमधून आपत्कालीन जिन्यावर आला आणि तेथून त्याने पळ काढला होता. इमारतीची सुरक्षा अपुरी आहे. सीसीटीव्ही यंत्रणा जुनी झाली होती आणि पोलिसांना फुटेज पाहण्याची गरज होती, पण पासवर्ड कोणालाच माहीत नव्हता. ते सावरण्यासाठी जवळपास दोन ते तीन तास वाया गेल्यामुळे आरोपीला पळून जाण्यास बराच वेळ मिळाला अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. आरोपी मोहम्मद शरीफुल हा अ‍ॅथलेटिक्सचा चांगला खेळाडू असल्यामुळे तो कंपाउंड भिंतीवरून पटापट उड्या मारणे शक्य झाले अशीही माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

(हेही वाचा – भारतीय राज्यघटनेमुळेच भारताची जागतिक स्तरावर एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख; सभापती Ram Shinde यांचे प्रतिपादन)

हल्लेखोराविरुद्ध भक्कम पुरावे, १९ ठिकाणी आढळले बोटांचे ठसे

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक करण्यात आलेला बांगलादेशी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद उर्फ विजय दास याच्याविरुद्ध भक्कम पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. तपासादरम्यान, तज्ञांनी अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan)  याच्या निवासस्थानाच्या पायऱ्या, खिडक्या आणि इतर १९ ठिकाणी आरोपीचे बोटांचे ठसे आढळून आले होते. हे बोटाचे ठसे अटक आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद उर्फ विजय दास याचे असल्याचे स्पष्ट झाले आहे हे बोटांचे ठसे अटक आरोपी विरुद्ध भक्कम पुरावे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ल्याच्या दिवशी आरोपी इमारतीत घुसला आणि सैफ अली खानच्या घराकडे जाण्यासाठी पायऱ्या चढला. तो सैफचा धाकटा मुलगा जहांगीरच्या खोलीच्या बाथरूमच्या खिडकीतून आत गेला. घुसखोराला पाहताच, घरातील एक कर्मचारी, एरियामा फिलिप्स नावाची नर्स, जहांगीरचे रक्षण करण्यासाठी धावली. त्यानंतर आरोपीने तिच्यावर हेक्सा सॉ सारख्या शस्त्राने हल्ला केला.फॉरेन्सिक पथकाला सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) घरातील १९ ठिकाणी आरोपीच्या बोटांचे ठसे सापडले होते, हे बोटांचे ठसे अटक आरोपीच्या बोटांच्या ठशांसोबत जुळत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.